बारामती(वार्ताहर): दि. 24 नोव्हेंबर रोजी दिवसभरात बारामती शहरातून 30 तर ग्रामीण भागातून 16 रुग्ण असे मिळून 46 कोरोना बाधित रुग्ण संख्या आढळून आले आहेत.
काल 357 जणांचे आरटी-पीसीआर नमुने घेण्यात आले होते त्यापैकी 16 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळुन आले आहेत. 59 रुग्ण प्रतिक्षेत असुन इतर तालुक्यात 05 रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आले आहे. 146 रुग्णांची ऍन्टीजन तपासणी करण्यात आली यामध्ये 19 रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आले आहेत. काल दिवसभरात बारामतीत एकूण 46 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असल्याचे बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी कळवले आहे.
काल दि.23 नोव्हेंबर 20 रोजी प्रतीक्षेत असलेल्या 231 जणांचा आरटी-पीसीआर तपासणी अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी बारामती शहरातील 03 व तालुक्यातील 03 असे एकूण 06 रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहेत व इंदापूर तालुक्यातील 04 रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यामुळे बारामतीतील एकूण रुग्णसंख्या 4704 झालेली आहे.
बारामतीत 4 हजार 750 रुग्ण असून, बरे झालेले 4 हजार 362 आहे तर मृत्यू झालेले एकशे चोवीस आहेत. काल तालुक्यामध्ये खाजगी रुग्णालयात आरटी-पीसीआर 18 जणांचे नमुने घेण्यात आले त्यापैकी 11 रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आले आहेत.
बारामतीतील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, सध्या थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत व कोरोनाचे रुग्ण हळूहळू वाढू लागले आहेत त्यामुळे सर्वांनी काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी मास्क व सॅनिटायझरचा वापर व सोशल डिस्टंसींग पाळणे अत्यंत आवश्यक आहे, नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे व ज्येष्ठ नागरिक आणि इतर आजार असलेल्या नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे व कोरोना पासून स्वतःच बचाव करावा.