बारामती(वार्ताहर): उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांना मिळाल्या बातमीनुसार समर्थनगर येथे अचानक छापा घातला असता अमित अनिल धेंडे (वय-37 वर्ष रा.सिध्दार्थनगर,आमराई) याचे कब्जात बेकायदेशिर रित्या मादक पदार्थ गांजा स्वत:चे कब्जात बाळगला असताना मिळुन आला.
24 ऑक्टोबर 2020 रोजी मिळालेल्या माहितीनुसार स्वत: उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, सहा.पोलीस निरीक्षक सचिन शिंदे, पोलीस नाईक तात्यासाहेब खाडे, रूपेश साळुखे, पो.कॉ. सुहास लाटणे, दशरथ इंगवले, बंडु कोठे, योगेश कुलकर्णी, अजित राऊत यांनी अपर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते यांचे मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी दोन पंच इसम व जप्त मालाचे वजन करण्यासाठी किराणा दुकानदार भारत सुभाष मुथा यांचेसह अचानक छापा घातला असता आरोपी धेंडे याचेकडे अंदाजे 12 हजार 200 रूपये किंमतीचा 610 ग्रॅम मादक पदार्थ गांजा जप्त केला असुन पोलीस कॉस्टेबल योगेश गजानन कुलकर्णी यांचे फिर्यादीवरून ता.24 ऑक्टोबर 2020 रोजी एन.डी.पी.एस. ऍक्ट 1985 चे कलम 8(क), 20 (ब), ळळ./बी प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. गुन्हयाचा तपास सहा.पोलीस निरीक्षक सचिन शिंदे करीत आहेत.
सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख, बारामती विभागाचे अपर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते, बारामती उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा.पोलीस निरीक्षक सचिन शिंदे, मुकुंद पालवे, सौ. अश्विनी शेंडगे, सहा.पोलीस उपनिरीक्षक संदीपान माळी, पो.ह. अनिल सातपुते, पो.ना. तात्यासाहेब खाडे, रूपेश साळुखे, रामदास जाधव, दादासाहेब डोईफोडे, पांडरंग गोरवे, ओंकार सिताप पो.कॉ.सुहास लाटणे, दशरथ इंगवले, बंडु कोठे, योगेश कुलकर्णी, अजित राऊत, अतुल जाधव,नाथसाहेब जगताप, उमेश गायकवाड यांनी केला.