साप्ताहिक वतन की लकीरने बारामतीतील अवैध सावकारकीला फोडली वाचा –
बारामती(वार्ताहर): गेली दोन आठवडे सा.वतन की लकीर वृत्तपत्रात सावकारांच्या जाचातून प्रतिष्ठीत व्यापार्याचा गेली बळी या मथळ्याखाली प्रसिद्ध केलेल्या बातमीने वाचा फोडली होती. या वृत्ताची दखल घेत बारामती शहर पोलीस स्टेशनने सावकाराच्या मुसक्या आवळल्या व गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रतिक प्रितम शहा वय वर्षे व्यवसाय व्यापार रा. सहयोग सोसायटी प्लॅट नं.34, बारामती जि.पुणे यांनी दिलेल्या तक्रारी वरून बारामती शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. 568/2020 भा.द.वि.क. 306,506,34 महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 चे कमल 32(1) (2),39,45 अन्वये दि. 18 नोव्हेंबर 2020 रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन आरोपी नामे 1) जयेश उर्फ कुणाल चंद्रकांत काळे, रा.भिगवण रोड बारामती 2) जयसिंग उर्फ बबलु अशोकराव काटे देशमुख रा.देशमुख वस्ती पाटस रोड बारामती 3) संजय कोंडिबा काटे रा.काटेवाडी ता.बारामती 4) विकास नागनाथ धनके रा.इंदापुर रोड ) मंगेश ओंबासे रा.सायली हिल बारामती एमआयडीसी 5) प्रविण दत्तात्रय गालिंदे रा.खाटीक गल्ली बारामती ) हनुमंत सर्जेराव गवळी रा.अशोकनगर जैन मंदीराशेजारी बारामती 6) संघर्ष गव्हाळे रा.बारामती 7) सनी उर्फ सुनिल आवाळे रा.खंडोबानगर बारामती यांनी मयत नामे प्रितम शशीकांत शहा यांना व्याजाने पैसे देवुन दिलेल्या पैशाच्या व्याजाचे वसुलीसाठी तसेच सहयोग सोसायटी येथील बंगला व्याजाच्या पोटी नावावर करून घेवुन मयतास मानसिक त्रास देवुन आत्महत्यास प्रवृत्त केलेबाबत यातील मयत प्रितम शहा यांनी त्यांचे हस्ताक्षरात वरील लोकांची नावे लिहुन सुसाईट नोट करून ठेवलेली होती. त्यावरून मयताचा मुलगा प्रतिक प्रितम शहा याने दिलेल्या तकारी वरून वरील इसमांवरती बारामती शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयात 1) जयेश उर्फ कुणाल चंद्रकांत काळे रा.भिगवण रोड बारामती 2) जयसिंग उर्फ बबलु अशोकराव काटे देशमुख रा.देशमुख वस्ती पाटस रोड बारामती 3) संजय कोंडिबा काटे रा.काटेवाडी ता.बारामती ) प्रविण दत्तात्रय गालिंदे रा.खाटीक गल्ली बारामती 4) हनुमंत सर्जेराव गवळी रा.अशोकनगर जैन मंदीराशेजारी बारामती 5) सनी उर्फ सुनिल आवाळे रा.खंडोबानगर यांना अटक करण्यात आलेली असुन ) विकास नागनाथ धनके रा.इंदापुर रोड, 6) मंगेश ओंबासे रा.सायली हिल बारामती एमआयडीसी बारामती 7) संघर्ष गव्हाळे रा.बारामती हे सदर गुन्हयात फरारी आहेत.सदर गुन्हयाचा पुढील तपास मा.श्री.डॉ.अभिनव देशमुख पोलीस अधिक्षक सो ,पुणे ग्रामीण,मा श्री. मिलींद मोहिते अपर पोलीस अधिक्षक सो,बारामती मा.श्री.नारायण शिरगावकर उपविभागीय पोलीस अधिकारी सो,बारामती उपविभाग यांचेमार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे बारामती शहर पोलीस स्टेशन हे करीत आहेत. वरील लोकांकडुन कोणाला व्याजाच्या पैशासाठी मानसिक त्रास होत असेल तर त्यांनी बारामती शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार देणेस समक्ष यावे असे बारामती शहर पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व नागरिकांना पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी आवाहन केले आहे.
बारामती सहकारी बँकेतील कॅशइर हनुमंत गवळी हे जर असे अवैध धंदे करून अमाप पैसा गोळा करीत असतील तर बँकेच्या कार्यकाळात याने केलेल्या सर्व व्यवहाराची चौकशी करण्यात यावी. यातील संजय काटे हा संचालक नसताना कृषि उत्पन्न बाजार समितीची सर्व यंत्रणा वापरीत होता. दररोज सकाळी लवकर येऊन येथील फोनवरून सर्वांना बोलावून व्याज गोळा करणे, त्यांना समितीचाच चहा पाजणे येथील कर्मचार्यांकडून सेवा करून घेणे असे कृत्य करीत असल्याचे बोलले जात आहे. टेलीफोनचे इनकमिंग व आऊटगोविंग पाहिले असता सर्व सत्य पुढे येईल. यास पाठीशी घालणार्यावर कारवाई होणार का? असाही प्रश्र्न नागरीकांनी उपस्थित केला आहे. सामाजिक कार्याच्या नावाखाली ही मंडळी दानशूरपणा आणतात आणि राजकीय, सामाजिक क्षेत्रात वावरताना दिसतात. यामध्ये आणखीन नावे येण्याची शक्यता नाकारता येत नाही.