बारामती(वार्ताहर): बारामती शहर पोलीसांनी आरोपी बेरड्यज्ञा उर्फ नियोजन संदीप भोसले (वय-28 वर्षे रा.सोनगाव, ता.बारामती जि.पुणे) यास अटक केली.
बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं.501/2020 भा.द.वि.क 379 मधील चोरीस गेलेले चंदनाचा व आरोपीचा शोध सुरू असताना आरोपी मौजे मळद गावचे हददीत चंदनाची झाडे चोरण्यासाठी रेखी करीत असल्याची गुप्तबातमी मिळालेने पोलीसांनी त्यास ताब्यात घेतले असता त्याचेकडे चंदन तोडण्यासाठी लागणारे कुर्हाड, करवत, लोखंडी गिरमिट असे साहीत्यासह मिळुन आला. चंदन चोरीचे गुन्हयात अटक करून सखोल तपास केला असता आरोपीने त्याचा साथीदार गांगुली भोसले व इतर यासह बारामती शहर परीसरात एकुण 7 ते 8 घरफोडया केलेचे कबुली दिली. त्यानुसार आरोपीस सोबत घेवुन घरफोडी केलेले ठिकाणाची पाहाणी करून त्यानुसार इकडील अभिलेखावर गुन्हे दाखल आहेत काय? याची खात्री केली असता आरोपीने सांगितले ठिकाणी घरफोडी घडल्याचे व गुन्हे दाखल असल्याचे एफआयआर रजिष्टर वरून दिसुन आले. त्यानुसार आरोपीस घरफोडीचा गुन्हा रजि. नंबर 458/2020 भा.द.वि.क. 380,457,454 यामध्ये मे.कोर्ट साो,बारामती यांचेकडुन वर्ग करून पोलीस कस्टडीमध्ये घेतलेनंतर आरोपीकडुन घरफोडीचे एकुण 8 गुन्हयातील चोरीस गेलेले सोन्याचे दागिने रूपये 2 लाख 62 हजार रूपयेचे हे भारतीय पुरावा कायदा कलम 27 प्रमाणे निवेदन पंचनाम्याने दोन पंचसमक्ष जप्त करण्यात आलेले आहे.
सदर मिळुन आलेले मालाचे वर्णन व दाखल गुन्हा रजि. नंबर खालील प्रमाणे –
1) 60 हजार रूपये किंमतीचे एक सोन्याचे नेकलेस वजन अंदाजे 15 ग्रॅम असे जु.वा.कि.अ (सदरचे सोने बा.श.पो.स्टे. गु.र.नं 115/2020 भा.द.वि. 380,454 मधील आहे.)
2) 16 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे रिंगा दोन जोड वजन अंदाजे अर्धा तोळा, सोन्याचा बदाम वजन अंदाजे अर्धा ग्रॅम असे जु.वा.कि.अ (सदरचे सोने बा.श.पो.स्टे. गु.र.नं 346/2020 भा.द.वि. 380,454 मधील आहे)
3) 21 हजार रूपये किंमतीचे सोन्याची अंगठी वजन अंदाजे अडीच ग्रॅम, असे जु.वा.कि.अ (सदरचे सोने बा.श.पो.स्टे. गु.र.नं / भा.द.वि. 380,454 मधील आहे)
4) 60 हजार रूपये किंमतीचे एक सोन्याचे गंठण त्यात दोन डोरली व 124 काळे मनी वजन अंदाजे 2 तोळे असे (सदरचे सोने बा.श.पो.स्टे. गु.र.न 354/ 2019 भा.द.वि. 380 मधील आहे)
5) 45 हजार रूपये किंमतीची एक पिळयाची अंगठी वजन अंदाजे 5 ग्रॅम, कानातील सोन्यचे जुबे वजन अंदाजे 4 ग्रॅम, 1 नथ वजन अंदाजे 1 ग्रॅम, एक पिळयाची अंगठी वजन अंदाजे 2 ग्रॅम,एक पिळयाची अंगठी वजन अंदाजे 3 ग्रॅम, असे जु.वा.कि.अ (सदरचे सोने बा.श.पो.स्टे.गु.र.नं 225/2019 भा.द.वि. 380,457 मधील आहे )
6) 10 हजार रूपये किंमतीचे एक सोन्याची अंगठी वजन अंदाजे 6 ग्रॅम, (सदरचे सोने बा.श.पो.स्टे. गु.र.नं.61/2019 भा.द.वि. 380,457 मधील आहे)
7) 30 हजार रूपये किंमतीचे एक सोन्याचे कानातील टॉप्स वजन अर्धा तोळा, एक सोन्याचे डोरले वजन अंदाजे अर्धा तोळा असे जु.वा.कि.अ (सदरचे सोने बा.श.पो.स्टे. गु.र.नं 377/ 2019 भा.द. वि. 380,457 मधील आहे.
8) 20 हजार रूपये किंमतीचे 5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मनी मंगळसुत्र त्यात सोन्याच्या 2 वाटया व 12 मणी असलेले जु.वा.किं सदरचा माल गुरन 458/2020 आयपीसी 380,457)
वरील प्रमाणे आरोपीकडुन मुददेमाल जप्त करण्यात आलेला असुन आरोपीस दि.5 नोव्हेंबर 2020 रोजी पासुन अदयाप पावेतो पोलीस कस्टडी रिमाड मध्ये आहे.