बारामती(वार्ताहर): राणे परिवाराच्या सामाजिक कार्याच्या प्रेरणेने स्थापन केलेल्या श्री सोनेश्र्वर सेवा संघातर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 110 रक्तदात्यांनी रक्तदान करून आपला सहभाग दर्शविला.
रक्तदात्यांना संस्थेच्या वतीने ट्रॅकसूट, प्रमाणपत्र, केसरयुक्त दूध, फळे, बिस्कीटे इ. देण्यात आले. या शिबीरासाठी अक्षय ब्लड बँक पुणे यांची तज्ञ डॉक्टरांची टीम व कृष्णाई सोशल फाऊंडेशनचे मार्गदर्शन मिळाले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पै.शेखर डोईफोडे, विशाल हडंबर, संजय ताटे, पोपट मळेकर, विकास गोफणे इ. परिश्रम घेतले असल्याचे संस्थेचे अध्यक्ष प्रा.सचिन कोरटकर व सचिव तेजस गोफणे यांनी दिली.