कोरोनामुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन: 8 रुग्ण कोरोना बाधित

बारामती(वार्ताहर): दि. 12 नोव्हेंबर रोजी दिवसभरात बारामती शहरातून 04 तर ग्रामीण भागातून 04 रुग्ण असे मिळून 08 कोरोना बाधित रुग्ण संख्या आढळून आले आहेत.

काल 74 जणांचे rt-pcr नमुने घेण्यात आले होते त्यापैकी 04 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळुन आले आहेत तर प्रतिक्षेत एकही रुग्ण नसुन व इतर तालुक्यात 02 रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आले आहेत. 27 रुग्णांची अॅन्टीजन तपासणी करण्यात आली यामध्ये 04 रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आले आहेत. काल दिवसभरात बारामतीत एकूण 08 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असल्याचे बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी कळवले आहे. बारामतीत 4 हजार 313 रुग्ण असून, बरे झालेले 4 हजार 168 आहे तर मृत्यू झालेले एकशे वीस आहेत.

सर्व बारामतीकरांना आवाहन करण्यात येते की आपण सर्वांनी दिवाळीच्या मंगल समयी मास्क व सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टंसिंग पाळून कोरोना मुक्त दिवाळी साजरी करूया व आरोग्य रुपी धनाचे जतन करूया.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!