बारामती शिवसेनेच्या कल्पना काटकर यांचा समावेश
बारामती(वार्ताहर): कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर लॉकडाऊन काळात सोशल मिडीयाने प्रत्येकापर्यंत चांगल्या वाईट गोष्टी पोहचविल्या मात्र, ’दौंड कोविड हेल्पसेंटर’ या व्हॉट्सऍप ग्रुप आरोग्यदूत बनून त्रस्त रूग्णांच्या मदतीला धावला या ग्रुपच्या कार्याची दखल राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह अनेक मंत्र्यांनी घेऊन सन्मानपत्र दिले.
या ग्रुपने रेमेडिसिव्हर इंजेक्शन, बेड, रक्त व प्लाझ्मा उपलब्ध करून देणे व समुपदेशन असे कार्य केले. ालुक्यातील विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली असून प्लाझ्मादानबाबत मोठे कार्य या ग्रुपच्या माध्यमातून केले गेले. पुणे जिल्ह्यासह इतरही जिल्ह्यांतील नागरिकांना एका व्हॉट्सऍप मेसेजच्या माध्यमातून या ग्रुपने मदत केली आहे. गेल्या दोन महिन्यांत कोरोनाबाधित नागरिकांना प्लाझ्मा उपलब्ध, रेमेडिसिव्हर, रुग्णांना बेड, रुग्णांना रक्त उपलब्ध करून देण्यात आले आहे.
यामध्ये प्रामुख्याने भारतीय जैन संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष हर्षल भटेवरा (राहु,), मराठा महासंघाचे पुणे जिल्हा सचिव मयुर सोळसकर (कासुर्डी), सूरज चोरघे (यवत), धनराज मासाळ (केडगाव), जयेश ओसवाल, कल्पना काटकर (बारामती), हरितवारी फाउंडेशनचे नितीन हेंद्रे (यवत), प्रकाश वरुडकर (यवत), दिनेश गडधे (उंडवडी),सचिन गुंड (उंडवडी),प्रमोद उबाळे (यवत),स्वप्नील घोगरे (कानगाव), समीर पठाण (नानगाव), प्रसाद मुनोत (दौंड), रमेश राठोड (दौंड), सौरभ भंडारी (दौंड), रोहन सपकाळ (लोणी काळभोर), नीलेश कुंभार (चौफुला), सूरज नेटके (हडपसर), सुहास लोंढे (पुणे), निशांत ढोले (भोसरी), रोहन होले (वानवडी), हरि रोडे (चाकण), शिवम घोलप (जुन्नर), सचिन तोडकर (मंचर) यांचा या ग्रुपमध्ये समावेश आहे.