बारामती(वार्ताहर): बारामती स्पोर्टस् फाऊंडेशनच्या वतीने बारामती-महाबळेश्र्वर- बारामती 250 कि.मी.सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते असे संस्थेचे अध्यक्ष सतीश ननवरे यांनी सांगितले. दहा महिलांसह 65 हौशी सायकलपट्टूंनी सहभाग दर्शविला होता. दि.8 नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजता उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, गटनेते सचिन सातव, भाजपचे नेते प्रशांत सातव यांनी ध्वज दाखवून रॅलीला निरोप दिला. सायकल स्वारांनी 250 कि.मी.पूर्ण केल्याने त्यांचे प्रोत्साहन व कौतुक करण्यासाठी नगराध्यक्षा सौ.पौर्णिमा तावरे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, उद्योजक आर.एन.शिंदे, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, डॉ.अजिनाथ खरात, डॉ.हेमंत मगर, प्रशांत सातव इ. उपस्थित होते.
