पुणे: महाराष्ट्र मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर या संस्थेच्या मंगळवार दि.10 नोव्हेंबर 2020 रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत डॉ.पी.ए इनामदार यांच्या नेतृत्वाखालील आवामी महाज या पॅनलचे सर्व उमेदवारांच्या प्रचंड बहुमताने विजयी झाले.
आझम कॅम्पस मधील युनानी वैद्यकीय महाविद्यालय या संस्थेकडून चालविली जाते. या झालेल्या निवडणुकीत पेटन विभागातून डॉ.पी.ए. इनामदार व डॉ.एन. वाय. काझी हे बिनविरोध निवडून आले असून आजीव सदस्य विभागातून डॉ.नाझीम शेख व आबेदा इनामदार या विजयी झाल्या. सर्वसाधारण सदस्य म्हणून डॉ. आरिफअली मोहम्मद मेमन, इरफान वली मोहम्मद खान व डॉ. मुश्ताक मुकादम, दिलशाद शफीक पठाण, प्राध्यापक मुजफ्फर शेख इ.नी विजय प्राप्त केला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ऍड.जे.एफ शेरकर यांनी कामकाज पाहिले. सर्वत्र पी.ए.इनामदार यांचे अभिनंदन होत आहे.