सावकारांच्या जाचातून प्रतिष्ठीत व्यापार्याचा बळी प्रकरणात सुत्रे हलली!
बारामती(वार्ताहर): मागील अंकात प्रसिद्ध केलेल्या बातमीमुळे खाजगी सावकारांचे धाबे दणाणले बारामती शहर पोलीसांनी बातमीची दखल घेत नागरीकांमध्ये जागृती व्हावी व सावकाराची भिती दूर व्हावी म्हणून खाजगी सावकारांची तक्रार देणेबाबत रिक्षा फिरवून आवाहन करण्यात आले होते.
मात्र, प्रतिष्ठेचा बुरखा पांघणार्या पश्र्चिम कसब्यातील रोडटच सावकाराचा यामध्ये समावेश असल्याचे बोलले जात आहे. हा सावकार कोट्यावधी रूपये व्याजाने देतो. व्याज वसुल करण्यासाठी पिळदार शरीराचे युवक ठेवलेले आहेत. नगरसेवक, कॉन्ट्रॅक्टर इ. सावकार बुडत्याला किनार्याचा आधार याप्रमाणे पक्षाचा, पक्ष नेत्याचा व सामाजिक कामाचा आधार घेऊन समाजात काम करीत आहेत. यातील एक जेल रिटर्न सावकार म्हणतो, हे सर्व प्रकरण सावकारामुळे नव्हे तर त्यांच्या कौटुंबिक वादातून घडले आहे पण काही वृत्तपत्र सावकाराचा रंग देत आहेत, अशी बातमी पत्रकार लावीत नाही ती लावावी त्यांना आपण मदत करू.
मागील बातमी प्रसिद्ध झालेनंतर काही सुज्ञ नागरीक चौका-चौकात बोलताना आमच्या प्रतिनिधीने कानोसा घेतला असता ते सांगत होते की यामध्ये खूप मोठे सावकार आहेत ते ही उच्चभ्रू समाजातील आहेत त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणे अशक्य आहे. जर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घातल्यास लवकर या बलाढ्य सावकाराचे पितळ उघडे पडेल व या प्रतिष्ठीत व्यापार्याच्या पत्नी, दोन मुलांना न्याय मिळेल.
या प्रकरणात असणारे खाजगी सावकारांनी मुद्दल व व्याजाच्या रक्कमेसाठी जो मानसिक, आर्थिक त्रास दिला. त्यामुळे त्याने जीवन संपविले व पत्नी, मुलं बाळं उघड्यावर सोडून गेला. आज समाजाने पुढे येऊन अशा उच्चभ्रू वस्तीत, समाजात, पक्षात व नेत्यांचा आसरा घेऊन सावकारकी करणार्यांना धडा शिकविला पाहिजे व या सावकारांनी लुबाडलेल्या, लुटलेल्या स्थावर मालमत्तेबाबत केलेले करारनामा, मुदत खरेदीखत, साठेखत, वचनचिठ्ठी, चेक इ. पुन्हा मिळण्यासाठी प्रयत्न करावे.
या पिडीत कुटुंबावर खुप मोठा दबाव आहे. कुटुंबात पत्नी, दोन मुले आहेत त्यामुळे ते फिर्याद देण्यास भीत आहेत. त्यामुळे पोलीसांनी स्वत: फिर्यादी होऊन चौकशी करण्याची मागणी नागरीकांमधून होत आहे.
मोठ्या रक्कमेसाठी थेट खरेदीखत पर्याय….
सावकार एवढे हुशार झाले आहेत की, मोठी रक्कम व्याजाने देताना त्या कर्जदाराकडून मालमत्तेचे थेट खरेदीखत करून घेतात व एक साधा 100 रूपयाच्या स्टॅम्पपेपरवर परतीचा मुदत टाकून करारनामा करतात म्हणजे पैसे मुदतीत दिल्यानंतर पुन्हा खरेदीखत उलटून देतात.
माजी नगराध्यक्षांचा खुलासा…
हा व्यापारी माझा जिवलग मित्र होता, मी मित्रत्वाच्या नात्याने पैसे दिले होते ते त्याने मित्रत्वाच्या नात्याने परत दिले. मी कोणतेही व्याज घेतले नाही माझा सावकारकीचा धंदा नाही.