बारामती(वार्ताहर): जिल्हा पणन अधिकारी, पुणे यांचे सुचनेनुसार खरीप पणन हंगाम 2020-21 मधील किमान आधारभूत किंमत योजने अंतर्गत हमीभावाने भरडधान्य (मका) खरेदी साठीची ऑनलाईन नोंदणी
दि.1 नोव्हेबर 2020 पासुन सुरू करण्यात आली आहे. मका खरेदीची मुदत दि.31 डिंसेबर 2020 पर्यंत असुन ऑनलाईन नोंदणी झालेल्या शेतकर्यांचीच मका खरेदी करणेत येणार आहे. सध्या मकेचा हंगाम सुरू झाल्याने बाजारात आवक सुरू झाली आहे. मकेची आवक जादा होत असल्याने सर्वसाधारण दर्जेच्या मकेचे बाजारभाव हमीभावा पेक्षा कमी निघत आहेत. त्यामुळे बारामती मार्केट कमिटीने शासनाकडे हमीभाव खरेदी केंद्राची मागणी केल्याने ते मंजुर झाले आहे. त्यासाठी शेतकर्यांनी खरेदी केंद्रावर नाव नोंदणी करून खरेदी केंद्राचा फायदा घ्यावा असे आवाहन बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल खलाटे यांनी केले आहे.
मका खरेदी केंद्रावर शेतकर्यांनी नाव नोंदणी साठी मका पिकाची नोंद असलेल्या 7/12 उतारा, आधारकार्डची छायांकित प्रत व खऋडउ नमुद बँक पासबुक झेरॉक्स, मोबाईल नंबर इ. आवश्यक कागदपत्रे आणुन निरा कॅनॉल संघ, तिन हत्ती चौक बारामती येथे प्रथम ऑनलाईन नाव नोंदणी करावी. नोंदणी झालेल्या शेतकर्यांना नोंदणीच्या क्रमवारीनुसार मका खरेदी केंद्रावर आणण्यासाठी एसएमएस द्वारे कळविण्यात येईल. त्यानुसार शेतकर्यांनी खरेदी केंद्रावर मका स्वच्छ व वाळवुन आणावी. मकेचा हमीभाव दर रू.1850/- प्रति क्विटल असल्याची माहिती सचिव अरविंद जगताप यांनी दिली.