बारामती(वार्ताहर): दुर्मिळ कासव तस्करी प्रकरणातील दोन आरोपींच्या बाजुने ऍड.विनोद जावळे यांनी मे.प्रथम वर्ग न्यायाधिश मे.ए.जे.गिर्हे यांचे न्यायालयात केलेला युक्तीवाद ग्राह्य धरत प्रत्येकी आरोपीस 25 हजार जात मचुकल्यावरती मुक्त करणेच्या अटी व शर्तीवर जामीन मंजूर केला आहे.
आरोपींच्या वतीने ऍड.विनोद जावळे यांनी युक्तीवाद करताना म्हणाले की, अरोपी यांचा रिक्षा चालविणेचा व्यवसाय आहे. घटनेच्या वेळी आरोपी जेवण करेणसाठी भिगवण येथे गेले होते. रात्री बारामतीच्या दिशेने परत येत असताना त्यांना रस्त्यावरती कासव मिळून आले. त्यास इजा होवू नये म्हणून सदरचे कासव सुरक्षित ठिकाणी सोडण्याकरीता ताब्यात घेतले असता आरोपीस संशयावरून अटक करण्यात आली. या आरोपींची पुर्व इतिहास पाहता अशा प्रकारचा गुन्हा केल्याची नोंद नाही. या गुन्ह्यात सात वर्षापर्यंत शिक्षा उपलब्ध कायद्यात नमूद आहे. मा.सर्वोच्च न्यायालय याच्याकडील याचिका अरनेश कुमार विरूद्ध बिहार सरकार सन 2013 मधील नमूद केलेल्या आदेशानुसार ज्या गुन्ह्यास सात वर्षापर्यंत शिक्षा आहे अशा गुन्ह्यात आरोपीस अटक करता येणार नाही. प्रस्तुत गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त व आरोपी अटक केलेले असलेने प्रथमदर्शनी गुन्ह्याचा तपास पूर्ण झालेला आहे. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष दर्शनी साक्षीदार नाहीत. सदर कासवास कोणतीही इजा झालेली नाही. आरोपी शिकार करतेवेळी मिळून आले नाही. कासव दुर्मिळ प्रजातींचे असलेबाबत संबंधित तज्ञाचा अहवाल नाही. आरोपींचा कोणताही वाईट हेतू निष्पन्न होत नाही. अशा युक्तीवाद ग्राह्य धरून मे.कोर्टाने जामीन मंजुर केला.