बारामती: येथील आमराई विभागातील एकात्मिक घरकुल योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या इमारतीतील प्रलंबित पाण्याचा प्रश्र्न प्रभाग क्र.19 चे स्थानिक नगरसेवक नवनाथ बल्लाळ यांनी केलेल्या पाठपुराव्यातून मार्गी लावला.
या इमारतीतील एकुण 82 कुटुंब राहतात त्यातील दोन इमारतीमध्ये चाळीस कुटुंबियांना अनेक वर्षापासून पाण्याचा प्रश्न प्रलंबित होता. पाण्याची सोय नसल्याने महिलांना खालुन वर पाणी भरून ये-जा करावी लागत होती. यामध्ये होणारी दमछाक पहावत नव्हती. येथभल रहिवाशी व माजी नगरसेविका सौ.सविता लोंढे, बबनराव लोंढे, अनिल मोरे यांनी नगरसेवक नवनाथ बल्लाळ यांच्याकडे तक्रार केल्यानंतर, बल्लाळ यांनी सातत्याने पाठपुरावा करून अखेर या घरकुलातील चाळीस कुटुंबियांचा पाण्याचा प्रश्न सोडवला. पाण्याचा प्रश्न सुटल्यामुळे नागरिकांनी विशेषत: महिलांनी समाधान व्यक्त करून नगरसेवक नवनाथ बल्लाळ यांचे आभार मानले.