बारामती(वार्ताहर): बारामती नगरपरिषदेचे आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे यांचा वाढदिवस सर्व आरोग्य कर्मचारी, स्वच्छता दूत, अधिकारी यांच्या उपस्थितीत विधायक उपक्रमाने साजरा करण्यात आला.

यावेळी नगरपरिषदेचे आरोग्य सभापती मयुर उर्फ कुंदन लालबिगे, माजी नगरसेवक अभिजीत चव्हाण, आरोग्य निरीक्षक सुभाष नारखेडे, अजय लालबिगे, सुनिल धुमाळ, बबलू जगताप, पत्रकार शुभम अहिवळे, तानाजी पाथरकर, विकास कोकरे, तैनुर शेख इ. मान्यवर उपस्थित होते.
नुकताच एन्व्हॉर्लमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने कोरोना योद्धा म्हणून पुरस्कार राजेंद्र सोनवणे यांना प्राप्त झाला आहे. कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर त्यांनी केलेले कामाची दखल घेत त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे. त्यांच्या कामाबाबत उपस्थित मान्यवरांनी गुणगौरव करीत मनोगत व्यक्त केले. कोरोना काळात आरोग्य विभागाने जी कामगिरी केली ती वाखण्याजोगी आहे. तीन आरोग्य निरीक्षक, अतिक्रमण विभाग, उद्यान विभाग सर्व सफाई कर्मचारी यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.

यावेळी सुभाष नारखेडे, तैनुर शेख, तानाजी पाथरकर, अभिजीत काळे, कुंदन लालबिगे, शुभम अहिवळे यांनी मनोगत व्यक्त केले. वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. उपस्थित कर्मचार्यांना थंडीपासून ऊब मिळावी म्हणून ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. अशा विधायक उपक्रमाने वाढदिवस साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे आयोजन चंदन लालबिगे, अक्षय बिवाल, रितेश जाधव, युवराज खिराडे, यांनी केले होते. राजेंद्र सोनवणे यांचा बारामतीत असणारा दांडगा जनसंपर्कामुळे विविध ठिकाणी केक कापण्याचा कार्यक्रम करण्यात आला.