बारामती(वार्ताहर): तालुका रिपब्लिकन युवा मोर्चा उपाध्यक्ष शकुल कृष्णा मोरे यांनी अंजनगाव कर्हावागज नदीवरील पुल वाहुन गेल्याने दैनंदिन गैरसोयीबाबत नियोजीत धरणे आंदोलन सार्वजनिक बांधकाम विभागाने आठ दिवसात रस्ता खुला करण्याचे लेखी पत्र दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
शकुल मोरे यांनी दि.26 ऑक्टोबर रोजी अंजनगाव ग्रामस्थांना सदरचा पुल वाहुन गेल्याने विविध अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने जनजीवन विस्कळीत होऊन दळणवळण कठीण झाले आहे. या गैरसोयीला शासन,प्रशासन पातळीवरील हलगर्जीपणा ढिसाळ कारभारा विरोधात प्रशासन भवनाच्या प्रवेशद्वारावर अंजनगाव ग्रामस्थ, तालुक्यातील बहुजन मुस्लीम, शीव,फुले, शाहू, लहुजी, आंबेडकरी चळवळीतील सर्वसमावेशक कार्यकर्त्यांच्या वतीने आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला होता.
यावेळी रिपब्लिकन युवा मोर्चा पश्र्चिम महाराष्ट्र प्रभारी अजय लोंढे, पुर्व पुणे जिल्हाध्यक्ष अनिल मोरे, तालुकाउपाध्यक्ष शकुल मोरे, सामाजिक कार्यकर्ते संदीप बनसोडे, कॉंग्रेसचे शहर युवकाध्यक्ष योगेश महाडीक इ. कार्यकर्ते उपस्थित होते.