माजी सैनिक महिला बचत गटाच्या बसचे लोकापर्ण संपन्न

बारामती(वार्ताहर): राज्यात प्रथमचं माजी सैनिक महिला बचत गटाच्या माध्यमातुन बसेस खरेदी करून भाडे तत्वावर पुणे व पिंपरी चिंचवड मध्ये प्रवाशी वाहतूक सुरू करण्यात येत आहे त्याच धर्तीवर बारामती मध्ये बचत गट च्या बस चा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

या प्रसंगी कृषी विकास प्रतिष्ठानच्या विश्वस्त सुनंदा पवार,बारामती नगरपरिषद च्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, नगरसेविका कमल कोकरे,त्रिदल सैनिक संघटना प्रदेशाध्यक्ष संदीप लगड,दूध संघ माजी संचालिका शांताबाई शेळके,जय जवान आजी माजी सैनिक संघटना अध्यक्ष हनुमंत निबाळकर व इतर पदाधिकारी मान्यवर उपस्तीत होते.

राज्यातील माजी सैनिक यांच्या पत्नीनी एकत्र येऊन बचत गटाची स्थापना करून व विश्वविद्धा शेतकरी मल्टी ट्रेडिंग प्रा.लि.कंपनी संस्थापक व चेअरमन सुरेश गोडसे यांच्या मार्फत सैनिकांच्या परिवाराचे सक्षमीकरण व्हावे यासाठी बसेस महिला बचत गटाच्या प्रत्येक गटाला एक बस याप्रमाणे पुणे व पिंपरी चिंचवड शहरा मध्ये पी.एम. पी.एम. लिमिटेड संस्थेस भाडेतत्वावर 2 नोव्हेंबर रोजी देण्यात आल्या या सेवेचा बारामती येथे शुभारंभ करण्यात आला.

बारामती परिसरात माजी सैनिक महिलांचे 12 बचत गट सुरु आहेत. माजी सैनिकांच्या पत्नीनी एकत्र येऊन बचत गट सुरू करून बसेस भाडे तत्वावर देण्याचा उपक्रम यशस्वी होईल व त्या माध्यमातून महिला आर्थिक सक्षम होतील असे प्रतिपादन बचत गट अध्यक्षा वैशाली मोरे यांनी सांगितले. विविध क्षेत्रात महिला बचत गटाच्या माध्यमातून प्रगती करताना वीर पत्नीनी केलेला उपक्रम कौतुकास्पद असून त्यास नेहमी सहकार्य करू अशी ग्वाही सुनंदा पवार यांनी दिली. आर आर चव्हाण यांनी प्रास्ताविक केले तर आभार प्रदर्शन व सूत्रसंचालन विक्रम जगताप यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!