बारामती(वार्ताहर): मुंबई शहर येथे नियुक्त असणारे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी बारामती शहर पोलीस स्टेशनचा नुकताच पोलीस निरीक्षकचा पदभार स्विकारला आहे. औदुंबर पाटील यांची सायबर पोलीस स्टेशनला बदली करण्यात आली.
मुंबई शहर पुर्वी त्यांनी कोल्हापूर येथील हुपडी पोलीस ठाण्यात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्यांच्या कामाची दखल घेऊन एका संस्थेने त्यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र पोलीसरत्न पुरस्कार सुद्धा देण्यात आला होता.
हुपरी याठिकाणी त्यांनी गरीब, श्रीमंत न पाहता सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. अवैध व्यवसाय बंद करावेत म्हणून विविध उपक्रम राबविले या उपक्रमाचे जनतेतून स्वागत करण्यात आले. हुपरी येथे बेकायदेशीर फ्लेक्स, 31 डिसेंबरला दारू नव्हे दूध प्या उपक्रम, ज्येष्ठ नागरीकांचे प्रश्र्न, माणुसकीची भिंत, वृक्षारोपण, पोलीस स्टेशन सुशोभीकरण, निराधार महिलांचा प्रश्र्न, अतिक्रमण मुक्त रस्ते, 100 टक्के दारू,मटका मुक्त इ. उल्लेखनीय कामगिरी केली.
पोलीसांबाबत विश्र्वास, आत्मियता निर्माण व्हावी असे काम त्यांनी केले आहे. सामान्य जनतेचा आधार म्हणून पोलीसांकडे पाहिले गेले पाहिजे. बारामती शहरात अवैध धंदे करणार्यांनी आपला गाशा गुंडाळावा असेही त्यांनी सांगितले आहे. राजकीय मंडळी कधीही गुन्हेगारांना पाठीशी घालीत नाही तसे काही झाले तर त्यांचा सुद्धा विचार केला जाईल. सावकारांनी दुसरा धंदा बघावा तशा तक्रारी आल्यास चोपून काढून जेलची वारी करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले आहे. पत्रकार आमचे बंधू आहेत त्यांना योग्य तो सन्मान दिला जाईल मात्र, तुम्ही कुठेही चुकता कामा नाही अन्यथा त्यांची सुद्धा गय केली जाणार नाही. पोलीस मित्र म्हणून एक टीम निर्माण करणार आहे. वाहतुक कोंडीवर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.