मे.कोर्ट, शासकीय, राजकीय व्यक्तींचे प्रतिमा मलीन होईल असे छायाचित्र टाकणारा सेक्युलर रायटरचा संपादक आसिफ खान यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल!

माजी नगरसेवक अमजद अजिज बागवान यांनी फिर्यादीच्या वडिलांना तक्रार का दिली म्हणून विचारला जाब

बारामती(वार्ताहर): मदरस्याचा भ्रष्टाचार बाहेर काढणारे सामाजिक कार्यकर्ते सोहेल गुलमोहम्मद शेख (बागवान) यांचे फेसबुक अकौंटवरुन एकत्रीत फोटो घेऊन अनियमित निघणार्‍या साप्ताहिक सेक्युलर रायटरचा संपादक आसिफ अब्दुल्ला खान याने पान नं.2 वर छापुन त्याखाली अश्लिल मजकुर लिहून व प्रसिध्द करुन या महिलांचे चारित्र्य हनन करून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याने बारामती शहर पोलीस स्टेशनला तीन वेगवेगळे भा.द.वि.कलम 500,419, 354ए(1)(ळळळ),354ए(1)(ळ), छपाई आणि पुस्तक नोंदणी अधिनियम 1867 चे कलम 15,14, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2008 चे 67र व 66अ(ल) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी यांनी दि.20 ऑगस्ट 2020, दि.22 ऑगस्ट 2020 व दि.27 ऑगस्ट 2020 रोजी स्वतंत्र बारामती शहर पोलीस स्टेशन येथे ऑनलाईन तक्रार केली असुन सदर तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला आहे. या तिन्ही गुन्ह्यात तब्बल 6 दिवस आरोपी आसिफ खान यास मे.कोर्टाने पोलीस कस्टडी दिली होती.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, 23 एप्रिल 2019 रोजी फिर्यादी व फिर्यादीच्या शाळेतील वर्गमित्र असे बारामतीमध्ये वोटींग करण्यासाठी आलेली होते. त्यावेळीस फिर्यादीचा मानलेला भाऊ सोहेल गुलमोहम्मद शेख (बागवान) हे आम्हाला भेटले होते. मतदान झाल्यानंतर आम्ही एकत्र फोटो काढले सदरचे फोटो सोहेल यांनी त्याचे अधिकृत असलेले वैयक्तिक फेसबुक अकाऊटवर टाकलेले होते.

दि.14 ऑगस्ट 2020 रोजीचे साप्ताहिक सेक्युलर रायटर बारामती या वृत्तपत्रात हे फोटो पान नं.2 वर दोन फोटो प्रसिध्द केलेले होते त्यामध्ये त्यांनी पहिल्या फोटोवर मदरसा युनुसिया शनगशहा मशिदीच्या विरुध्द तक्रार करणारा सामाजिक कार्यकर्ते सोहेल शेख आपल्या दुसर्‍या या सामाजिक कामात व्यस्त असतानाचे फोटो आणि दुसर्‍या फोटो मध्ये ङ्गबुलाती है मगर जाने का नई ये दुनिया है इधर जाने का नई मेरे बेटे किसी से इश्क कर मगर हद से गुजर जाने का नईङ्घ असा मजकुर प्रसिध्द केला यावरुन असे दिसुन येते की फिर्यादी आणि सोहेल एकमेंकाबरोबर इश्क करीत आहे. या वृत्तातून फिर्यादींच्या चारित्र्यावर संशय घेतला आहे. सदरील वृत्त व वृत्तपत्राने फिर्यादींच्या लैंगिक भावना उद्दीपित करणार्‍या कृतीचा किंवा वर्तणुकीचा अंतर्भाव दिसुन येत आहे. याबाबत दि 21 ऑगस्ट 2020 रोजी सायंकाळी अमजद अजिज बागबान यांनी फिर्यादीच्या वडिलांना फोन करून म्हणाले की तुमच्या मुलीने तक्रार का दिली त्यावर फिर्यादीच्या वडीलांनी तक्रारी बाबत माहिती व शहानीशा केली असता त्यावेळी फिर्यादी व फिर्यादीचे वडिलांना कळाले की असीफ खान यांने त्याच्या वृत्तपत्रात फिर्यादी व फिर्यादीच्या मित्र-मैत्रिणीचे फोटो टाकलेला आहे. बारामती येथील मदरसा दारुल उलुम मौलाना युनिसीया चे ट्रस्टींच्या सांगण्यावरुन सदरील वृत्तपत्र छापलेले आहे असे कळाले आहे. सदरचा मजकुर वृत्तपत्राचे संपादक यांने टाकल्याने फिर्यादींच्या भाऊ बहीणीच्या नात्याला कलंक लावला आहे. फिर्यादी व फिर्यादीच्या मैत्रिणीच्या चारित्र्यावर टिका केलेली आहे. त्याबाबत फिर्यादीच्या अनेक मित्रांणी समक्ष भेटून व फोन करुन विचारणा केली त्यामुळे फिर्यादीचे चरित्र्यहनन केलेने फिर्यादीला लाज वाटु लागले आहे. समाजामध्ये फिर्यादीच्या चारित्र्यावर संशय उपस्थित होवु लागला आहे असे फिर्यादीत म्हटले आहे.

वृत्तपत्र छापणे, प्रसिद्ध करणे, संपादकाचे हक्क व कर्तव्य या सर्व बाबीला कायद्यानुसार आचारसंहिता आहे. मात्र, हा आरोपी संपादक शासनाचे अधिकारी, कर्मचारी, राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व विशेषत: न्यायाधिशांची प्रतिमा मलीन होईल असे छायाचित्र वृत्तपत्रात प्रसिद्ध करीत असतो. या आरोपी संपादकाचा आतापर्यंतचा इतिहास पाहिल्यास विविध गुन्हे याच्यावर दाखल आहेत व चालु सुद्धा आहेत. प्रेस ऍक्टचा भंग करीत सतत वृत्तपत्र छापून प्रसिद्ध करीत असतो. वैयक्तिक लोकांचे चित्रविचीत्र छायाचित्र टाकून टारगेट करण्याचे काम हा आरोपी संपादक करीत आलेला आहे. त्यामुळे अशा सामाजिक संतुलन बिघडविणार्‍या संपादकावर प्रतिबंधात्मक कारवाई होण्याची गरज आहे.

काही साप्ताहिकामुळे इतर साप्ताहिकवाल्यांची अब्रु वेशीला टांगली! कमी शिक्षण, संकुचित बुद्धी, कायद्याने कमी ज्ञान, काहींना तर वाचता सुद्धा येत नाही. प्रेस अॅक्टची माहिती नाही. वार्षिक विवरणमध्ये बोगस आकडेवारी, नियमित वृत्तपत्र प्रकाशित नाही, काहींची तर छपाईची प्रेस नसताना सुद्धा छपाई मशिनची नोंद, वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रशासनावर दबाव, वृत्त प्रसिद्ध करून वेठीस धरणे इ. प्रकारामुळे इतर साप्ताहिक वाल्यांची अब्रु वेशीला टांगली गेली आहे. अशा त्रुटी असणाऱ्या वृत्तपत्रांचे डिक्लरेशन रद्द करण्याचे अधिकार उपविभागीय अधिकारी यांचा आहे त्यामुळे त्यांनी तातडीने एक दैनिक, दोन सामाहिक व संबंधित अधिकाऱ्यांची एक समिती नेमुण सर्व साप्ताहिकांची सखोल चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याची गरज आहे.

या गुन्ह्यात पोलीस तपासाकामी संबंधित वृत्तपत्राच्या संपादकाला असिफ जाफर बागवान, हाजी अमजद अजिज बागवान, मुख्तार उस्मान बागवान, हाजी फिरोज अजिज बागवान, अस्लम फकीर बागवान, सलीम (बाळू) अब्दुल बागवान यांनी मजकुर छापणेसाठी २५ हजार रूपये असिफ जाफर बागवान याने हस्तकामार्फत दिले असल्याचे रिमांड रिपोर्टमधून पुढे आले आहे. म्हणजे ही मंडळी सदरचा भ्रष्टाचार नये म्हणून सोहेल बागवान यांच्यावर या-ना त्या मार्गाने दवाव तंत्र वापर करीत आहेत. सोहेलचे वकील, सोहेलची बातमी प्रसिद्ध करणारे संपादक, पत्रकार व सोहेलबरोबर फिरणाऱ्यांची सुपारी देण्यास सुद्धा ही मंडळी मागे पुढे पाहणार नाहीत. या लोकांच्या जीवाला सुद्धा धोका निर्माण झाला आहे. तिऱ्हाईत इसमांना पुढे करून खोटे गुन्हे दाखल करण्याच्या प्रयत्नात असल्याचे कळते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!