सावकारात माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, कॉन्ट्रॅक्टर, दोन नामवंत व्यापारी व इंदापूररोडच्या दोघांचा समावेश?
अन्याय करणार्यापेक्षा अन्याय सहन करणारा खूप मोठा गुन्हेगार असतो : लवकरच शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होणार?
बारामती(प्रतिनिधी): मध्यंतरी बारामती शहरात एका प्रतिष्ठीत व्यापार्याने सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रयत्न फसला व त्या प्रतिष्ठीत व्यापार्याचा शेवटी उपचारा दरम्यान बळी गेला. या प्रतिष्ठीत व्यापार्याच्या बळीस बारामती येथील माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, कॉन्ट्रॅक्टर, दोन नामवंत व्यापारी व इंदापूर रोडच्या दोघांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे.
सावकार अवैधरित्या कर्जदाराची मालमत्ता हडप करणे, दिलेल्या कर्जावर अवास्तव दराने व्याज आकारणे असे कृत्य सर्रास पहावयास व ऐकावयास मिळत असतात. तत्कालीन पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पुणे ग्रामीण विभागात सावकारांच्या मुसक्या आवळल्या होत्या. मात्र, आता पुन्हा बेकायदेशीर खाजगी सावकारांनी डोकं वर काढू लागले आहेत.
या सावकारांनी व्यापार्यास मानसिक, आर्थिक त्रास दिला. पैसे नाही तर स्थावर मालमत्ता बळकाविली असल्याचे कळते. बळकाविणारे सावकार ज्या पटीत स्थावर मालमत्ता किंवा कर्जाऊ रक्कम देत असतील तर ते शासनास तेवढा वार्षिक आयकर भरत असतील का? हा प्रश्र्न सर्वसामान्य नागरीकांना पडलेला आहे. आज एवढी मोठी कोट्यावधी रूपयांची मालमत्ता नगरसेवकाची ढाल करून बळकाविली आहे. या सर्व बेकायदेशीर सावकारांनी कोट्यावधी रूपयांचे कर्ज या व्यापार्यास दिले होते. आज ना उद्या पैसे येतील व मी तात्काळ सावकारांनी देणी देवून टाकीन असे या व्यापार्यास वाटत होते. मात्र, येणारा पैसा आला नाही व कर्जाचा, व्याजाचा डोंगर वाढत गेला. हे सावकार या व्यापार्याच्या मानगुटीवर बसून लचके तोडत होते. या सर्व त्रासाला कंटाळून व्यापार्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला यामध्ये त्यांचा उपचारा दरम्यान बळी गेला.
एखाद्या सावकाराने कर्ज व व्याजाच्या पोटी स्थावर मालमत्ता विक्री, गहाण, लीज, अदलाबदल किंवा कोणत्याही मार्गाने ताब्यात घेतली असेल तर जिल्हा निबंधकाकडे तक्रार करून संबंधीत निबंधक चौकशी करून स्थावर मालमत्तेचा झालेला व्यवहार रद्दबातल ठरवून ती मालमत्ता कर्जदार किंवा त्यांच्या वारसांना ताब्यात देण्याचे आदेश करतात.
अशा बेकायदेशीर सावकारांवर चाप बसविण्यासाठी बळी गेलेल्या व्यापार्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी एका पाऊल पुढे येण्याची गरज आहे. सर्व प्रशासन विशेषत: पोलीस प्रशासन तुम्हाला न्याय मिळवून संरक्षण सुद्धा देतील. या बळी गेलेल्या व्यापार्याची स्थावर, जंगम मालमत्ता जरी त्यांच्या नातेवाईकांना परत मिळाली तरी त्या बळी गेलेल्या व्यापार्याच्या आत्म्यास शांती लाभेल. अन्यथा काळ,वेळ व समाज कदापिही माफ करणार नाही. अन्याय करणार्या पेक्षा, अन्याय सहन करणारा खूप मोठा गुन्हेगार असतो त्यामुळे लवकरच बारामती शहर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल होणार असल्याचे कळते.
नवीन सावकारी कायद्यात विनापरवाना सावकारी करण्यास 5 वर्षापर्यंत कैदेची शिक्षा किंवा 50 हजार रूपयांपर्यंतच्या दंडाची शिक्षेची तरतुद आहे.
Very sad