पोलीस बॉईज असोसिएशनच्या वतीने पदोन्नती झालेल्यांचा सत्कार!

बारामती(वार्ताहर): पोलीस बॉईज असोसिएशनच्या वतीने पोलीस उपनिरीक्षपदी पदोन्नती झालेल्या दिलीप निवृत्ती सोनवणे व दादासाहेब संभाजी ओमासे यांचा सत्कार करण्यात आला.

सन 2013 मध्ये पोलीस खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा दिलेले ठाणे अंमलदार यांना सुमारे 7 वर्षानंतर न्याय मिळाला. पोलीस महासंचालक यांचे आदेशान्वये पदोन्नती देण्यात आली आहे. पोलीस बाईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष रवि ना.वैद्य यांनी या प्रकरणात पोलीसांना वेळोवेळी मार्गदर्शन, पाठबळ देवून सरकार दरबारी पाठपुरावा देखील केलेला होता.

सदरचा सत्कार तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांच्या शुभहस्ते व पोलीस बॉईज असोसिएशनचे शहराध्यक्ष संजय दराडे, अभिजीत पवार, साजन अडसुळ, शैलेश खरात, अनिकेत वणवे, अमोल गायकवाड, हर्षद दराडे, अमोल बिनवडे, साहील तांबोळी, सुदर्शन निचळ, दीपक कळसकर, पंकज पवार, संतोष काकडे, आकाश धोत्रे यांच्या उपस्थित करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!