बारामती(वार्ताहर): बारामती शहरातल्या आमराई भागातील महात्मा फुले सोसायटीतील व्यायामशाळेचे धम्मचक्र परिवर्तन दिन आणि विजयादशमीच्या मुहूर्तावर नगरीच्या नगराध्यक्षा सौ.पौर्णिमा तावरे यांच्या शुभहस्ते उदघाटन करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, नगरसेवक राजेंद्र बनकर, बाळासाहेब जाधव, बिरजू मांढरे, मयूर लालबिगे, अभिजीत चव्हाण, किशोर मासाळ, पांडुरंग चौधर, सूरज शिंदे, श्रीजीत पवार, संतोष सातव, विलास काटे, योगेश ढवाण, योगेश गिरी, गणेश कदम, शिवराज पवार, शैलेश पवार, सलीम शेख, सुशील अहिवळे इ. मान्यवरांच्या उपस्थितीत होते.
गेल्या 25 वर्षांपासून ही इमारत बांधून तयार होती. मात्र साहित्य नसल्याने इमारत पडून होती. त्या पार्श्वभूमीवर या प्रभागाच्या कार्यक्षम नगरसेविका अनिता दिनेश जगताप यांनी उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यामुळे या व्यायामशाळेसाठी अतिशय उच्च दर्जाचे साहित्य उपलब्ध झाले आहे. शासनानेही आता व्यायामशाळा सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांसाठी ही सुसज्ज अशी व्यायामशाळा उपलब्ध झाली आहे.
श्रीजीत पवार, भगवान चौधर आणि संतोष सातव यांनी या व्यायामशाळेसाठी मॅट उपलब्ध करून दिली. तसेच श्रीजीत पवार यांच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपस्थितांना सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एस.एस.एस.ग्रूपच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.