बारामती(वार्ताहर): एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्षा सौ.सुनेत्रावहिनी पवार यांचा वाढदिवसानिमित्त करणआण्णा इंगुले मित्र परिवाराकडून पोलीस प्रशासनास 500 मास्क वाटप करण्यात आले.
करणआण्णा इंगुले सतत विधायक व समाजोपयोगी उपक्रम राबवित असतात. त्याचाच एक भाग म्हणून कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर सतत फिल्डवर असणार्या, कायदा व सुव्यवस्था अबाधीत ठेवणार्या पोलीसांना मास्क वाटप करण्याचा मनोदय त्यांनी केला होता. त्यानुसार सौ.सुनेत्रावहिनी पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन 500 मास्क पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी दौंड पोलीस ट्रेनिंग सेंटर चे पोलीस निरीक्षक श्री.जाधव तसेच बारामती नगरपरिषदचे नगरसेवक अमर धुमाळ हे उपस्थित होते.