बारामती(वार्ताहर): डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसाहत वासीयांच्या आनंदात, संकटातील एकच मसीहा नगरसेवक बिरजू मांढरे आहे. मध्यंतरी पाऊस, वादळीवार्यामुळे या वसाहतीचे पुर्नवसन केलेल्या पत्राशेडचे नुकसान झाले. जनजीवन विस्कळीत झाले मात्र, नगरसेवक बिरजू मांढरे यांनी क्षणाचाही विचार न करता येथील रहिवाशांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप केले.
14 ऑक्टोबर रोजीच्या अतिवृष्टीचा फटका गोर-गरीब लोकांच्या झोपड्या,पत्राशेडला जास्त बसला. यामध्ये वसाहतीचे पुर्नवसन केलेल्या ठिकाणी ओढ्याचे पाणी घुसण्यास सुरुवात झाली या अतिवृष्टीचा आढावा घेत नगरसेवक बिरजू मांढरे तत्काळ त्या ठिकाणी पोहचले व जेसीबीद्वारे ओढ्यातील वाहणार्या पाण्याला मोकळी जागा करण्यास सुरुवात झाली पण वेगाने सुरू असलेल्या पाऊसामुळे ओढ्याच्या पाण्याची पातळी वाढत राहिली आणि हळू हळूहळू पाणी पत्राशेडकडे वळण्यास सुरुवात झाली. अशा परिस्थिती संपर्क तुटला. पाण्याची पातळी वाढत चालल्याने मांढरे यांनी प्रत्येक घरात जाऊन सतर्क राहण्याचे निर्देश दिले, अगदी काही वेळातच ओढया बरोबरच संपूर्ण पत्राशेडमध्ये ही पाण्याची पातळी वाढत असल्याचे निदर्शनास येताच व मनुष्यहानी टाळण्यासाठी नगराध्यक्षा सौ.पौर्णिमा तावरे, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, नगरसेवक बिरजू मांढरे यांनी प्रत्येक नागरिकांना घराबाहेर काढले व सांस्कृतिक केंद्र या ठिकाणी निवारा दिला. रात्रीच्या 12 वा. किरण गुजर यांनी जेवण उपलब्ध करून दिले. दि.15 ऑक्टोबर रोजी जशी पाण्याची पातळी कमी झाली. या अतिवृष्टीत घरातील अत्यावश्यक वस्तू पाण्यात भिजून गेल्या. नगरसेवक बिरजू मांढरे यांनी या ठिकाणी झालेल्या नुकसानाचा प्रशासनाद्वारे पंचनामा करून घेतला तसेच सदरचा सर्व परिसर निर्जंतुकीकरण करून घेतला. जिल्हाधिकारी राजेश देशमुख, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, जेष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी अतिवृष्टीचा आढावा घेतला व किरणदादा गुजर यांनी नागरिकांची जेवण, चहा, नाष्टाची सोय उपलब्ध करून दिली. यामधे मा. नगरसेवक अभिजीत चव्हाण व नगरसेवक अभिजीत जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
दि.17 ऑक्टोबर 2020 रोजी मा. उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक बिरजू मांढरे यांच्या स्वखर्चातुन नगराध्यक्षा सौ.पौर्णिमा तावरे यांच्या उपस्थितीत व जेष्ठ नगरसेवक किरण गुजर यांच्या हस्ते अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या 140 कुटुंबाना पांघरण्यासाठी उबदार रघ, चादर, महिलांना साड्या, 5 किलो गव्हू, 5 किलो तांदूळ, 1 किलो तेल, मिठ, वांगी, टोमॅटो, बटाटे, भेंडी, काकडी, भोपळा,मिरची, आले, लसूण, कोथिंबीर, मेथी इ. फळ भाज्या आणि पाले भाज्यांचे वाटप केले या वेळी नगरसेवक अभिजीत जाधव व मा. नगरसेवक अभिजीत चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते धनंजय तेलंगे, अंकुश मांढरे उपस्थित होते.