बारामती(वार्ताहर): राष्ट्रीय समाज पक्ष बारामती तालुका यांच्या वतीने बारामती तहसीलदार कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन करण्यात आले त्या वेळी नुकसान झालेल्या शेतमालाची होळी करून बोंब मारून सरकारचा निषेध करण्यात आला. नेत्यांनी दौरे थांबवावेत तात्काळ मदत द्यावी व लवकरात लवकर सरकारने ओला दुष्काळ जाहीर करवा व नुकसान झालेल्या शेतकर्याला प्रति एकरी 50 रू मदत द्यावी या मागणी साठी आंदोलन करण्यात आले. नायब तहसीलदार धनंजय जाधव यांनी बाहेर येऊन अंदोलनकर्ते यांचे निवेदन स्विकारले व आपली मागणी शासन दरबारी पोहचवू असे आश्वासन दिले.
यावेळी रासपचे पश्र्चिम महाराष्ट्र प्रभारी माणिकराव दांगडे, आण्णा रूपनवर, जिल्हा अध्यक्ष संदिप चोपडे, तालुका अध्यक्ष ऍड.अमोल सातकर, विठ्ठल देवकाते, काका बुरूंगले,गिरीधर ठोंबरे, शैलेश थोरात, लखन कोळेकर, अविनाश मासाळ, चंद्रकांत वाघमोडे, भिसे, दिलीप धायगुडे, किशोर सातकर, निखील दांगडे, भुषण सातकर, तेजस जमदाडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.