बारामती(वार्ताहर): एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने बारामती नगरपरिषदेतील रुग्णांच्या अंत्यविधीची जबाबदारी समर्थपणे पार पाडत असणार्या कर्मचारी व अधिकार्यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले.
त्याचाच एक भाग म्हणून बारामती नगरपरिषदेचे आरोग्य अधिकारी राजेंद्र सोनवणे व सोबत असणार्या योद्ध्यांचा विशाल जाधव मित्र मंडळाच्या वतीने अक्षय-आनंद कम्युनिटी सेंटर याठिकाणी फेटा, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या सदस्यांनी सौ.सुनेत्रावहिनी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विधायक व समाजोपयोगी कार्यक्रम राबवून एक आदर्श घालून दिलेला आहे. अशा पुरस्कारामुळे नगरपरिषदेच्या विशेषत: आरोग्य विभागाच्या कर्मचारी व अधिकार्यांना काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल व त्याच पटीत ते आणखीन जोमाने काम करतील असे विशाल जाधव यांनी यावेळी बोलताना सांगितले. यावेळी देसाई इस्टेट येथील सामाजिक कार्यकर्ते, मित्र परिवार उपस्थित होता.