बारामती(वार्ताहर): शिवसेना पक्षाच्या माध्यमातून सामाजिक कार्यात उल्लेखनिय कार्य करणारे शौकत बशीरभाई बागवान यांचे वडिल बशीरभाई हुसैनभाई बागवान यांचे अल्पश: आजारामुळे दि.20 ऑक्टोबर 2020 रोजी राहते घरी दु:खद निधन झाले.
बशीरभाई हे गेल्या 30 ते 40 वर्षापासून दुर्गा टॉकीज रोड लालबिगे चौकात फळ विक्री करीत होते. सतत हसतमुख असणारे बशीरभाई आज आपल्यातून निघन गेले आहेत. त्यांच्या जाण्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे. एवढ्या वर्ष एकाच ठिकाणी फळ विक्री तून त्यांनी मित्रत्वाचे अतुट नाते निर्माण केले होते. त्याचे मागे पत्नी, विवाहित दोन मुले, चार मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. जुने जानते बशीरभाई गेल्याने मुस्लीम समाजावर खुप मोठा आघात झाला आहे.