भिगवण: दि.09 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री 09/30 वा. चे सुमारास फिर्यादी हे त्यांच्या कुटुंबासह पुणे येथे जात असताना त्यांचे चार चाकी वाहन पंक्चर झाल्यामुळे ते पंक्चर काढण्यासाठी पुणे-सोलापूर महामार्गावर डाळज नंबर 3 या गावच्या हद्दीत महामार्ग लगत थांबले असता वरील दोन संशयित इसम व त्यांच्यासोबत असणार्या आणखी तीन लोकांनी त्यांना मारहाण करून रोख रक्कम व सोन्याचे दागिने लुटल्या बाबत भिगवण पोलिस स्टेशन पुणे ग्रामीण येथे सी.आर. 387/2020 आयपीएस 395 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

या गुन्ह्यातील आरोपींचे सोबतचे रेखाचित्र असून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, यांना आपण ओळखत असाल तर भिगवण पोलीस स्टेशनचे खालील नंबरवर संपर्क करून माहिती द्यावी. माहिती देणार्याचे नाव पुर्णपणे गुप्त ठेवले जाईल. अधिक माहितीसाठी एपीआय जीवन माने, 9834553300, पीएसआय रियाज शेख, 8605057788 यांच्याशी संपर्क साधावा.
आरोपींचे रेखाचित्र काढण्यात आले आहे याबाबत कोणाला काही माहिती असल्यास संपर्क साधावा.