आसिफ शेख यांजकडून…
माळेगाव(वार्ताहर): गाळा लिलावात जास्तीचे आलेले 50 हजार ग्रामपंचायत माळेगावच्या वसुली अधिकारी रेश्मा शेख यांनी प्रामाणिकपणे परत केल्याने त्यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मान करण्यात आला.
माळेगाव ग्रामपंचायत येथे गाळा लिलावात भाग घेण्यासाठी घाईघाईत दत्तात्रय तावरे यांनी 50 हजार रुपयांऐवजी 1 लाख भरले. ही बाब वसुली अधिकारी रेश्मा शेख यांच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने ग्रामपंचायत सदस्य प्रशांत मोरे यांना घडलेला प्रकार सांगितला. दत्तात्रय तावरे यांना संपर्क साधून जास्तीचे आलेले पैसे 50 हजार परत देण्यात आले.
रेश्मा शेख यांच्या प्रामाणिकपणाबद्दल सरपंच जयदीप तावरे यांनी सत्कार केला. यावेळी उपसरपंच अजित तांबोळी, जयदीप तावरे, अनिल लोणकर, राजाभाऊ खरात, धर्मराज पैठणकर इ. मान्यवर उपस्थित होते. माळेगाव परिसरात रेश्मा शेख यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.