मला तातडीने इंजेक्शनची गरज आहे. मला बेड मिळत नाही, प्लाझ्मा पाहिजे, माझ्या आई-वडिलांची बिकट अवस्था झालेली आहे. काही तरी करा…..कोरोना बाधित नातेवाईकांची हृदयाला पाझर फोडणारी हाक ऐकल्यावर मन सुन्न झालेशिवाय राहत नाही. लॉकडाऊन लागलेपासून सर्वांना मदतीचा हात देणारे, नागरीकांच्या हाकेला धावणारे, मदत लागल्यास साहेब, दादा व ताईंना सांगून मोठ्या शहरात बेड, उपचार उपलब्ध करून देणारे बारामती नगरपरिषदेचे ज्येष्ठ नगरसेवक किरण (दादा) गुजर आहेत. यांनी आजपर्यंत केलेल्या कार्याचा आलेख पाहता हे ही खरे कोरोना योद्धे आहेत असे म्हणून तो माणुस स्वत:हून किरणदादांचे अभिनंदन करण्यास गेल्याशिवाय राहणार नाही.
किरणदादांनी खुप जवळून कोरोना रूग्ण हाताळलेला आहे. त्यामुळे कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यानंतर काय करायचे, कसे करायचे, कोणती औषधे घ्यायची, इंजेक्शन कधी द्यायचे याबाबतची माहिती त्यांना चांगलीच अवगत झालेली आहे. मध्यंतरी रेडमीसीव्हर इंजेक्शनचा तुटवडा जाणवला तर तातडीने त्यांनी बारामतीत उपलब्ध करून दिले. वाढत्या रूग्णांचा विचार करीत शासकीय रूग्णालयात होत असलेली रूग्णांची हेळसांड पाहता त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह व एमआयडीसी येथे कोविड रूग्णांसाठी उत्तम अशी सोय केली. या कोविड सेंटरमुळे रूग्णांमध्ये होणारी वाढ थांबली व पूर्णपणे बरे झालेले रूग्ण या सेंटरमधून बाहेर पडत होते तेही आनंदात व निसंकोचपणे.
मध्यंतरी अशा रूग्णांच्या नातेवाईकांना रेडमीसीव्हर इंजेक्शन मिळत नव्हते त्यांनी तातडीने मोफत उपलब्ध करून दिले. रेडमीसीव्हर इंजेक्शन मिळण्याचे ठिकाण सुद्धा प्रसिद्ध केले. यामुळे सर्वसामान्य नागरीकांना ते सहजासहजी उपलब्ध होत होते. लॉकडाऊन काळात रिक्षा चालक/मालकांची उद्भवलेली परिस्थिती पाहता त्यांना जीवनावश्यक किट ना.अजित पवार यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले. ज्या लोकांची उपजिवीका मागून खाल्ल्याशिवाय भागत नाही अशा दुर्लक्षित समाज व लोकांना त्यांनी सढळ हाताने मदत केली. याचकाळात स्वत: व नटराज नाट्य कला मंडळाच्या माध्यमातून, दानशूरकांकडून गव्हू, तांदुळ इ. स्वरूपात स्विकारून नागरीकांची मदत केली. रात्री-अपरात्री दुसर्या रिंगला फोन उचलणारे किरण गुजर आहेत. जागतिक संकटात त्यांनी बारामतीकरांची त्यांच्याकडून जी मदत होईल ती त्यांनी केली याबद्दल त्यांचे धन्यवाद मानावे तेवढे कमीच आहेत.
96 खोल्यांची गोर-गरीब, हातावरचे पोट असणार्या लोकांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसाहतीवर असणारे आरक्षण व वसाहत पाडल्यानंतर विरोधकांनी पक्ष व पक्षाचे नेते बदनाम करण्याचा डाव रचला. मात्र, किरणदादांनी न डगमगता एक आव्हान स्विकारल्याप्रमाणे त्यांनी वसाहतीवर असणारे आरक्षण काढून आणले. त्याच ठिकाणी 96 पेक्षा जास्त खोल्यांची दर्जेदार, सर्व सोयीयुक्त इमारत उभी राहणार आहे. सध्या या लोकांची ज्याठिकाणी सोय करण्यात आली त्याठिकाणी अतिवृष्टीमुळे तारांबळ उडाली आहे. एवढ्या पावसात स्थानिक नगरसेवक, नगराध्यक्षा, ज्येष्ठ नगरसेवकांनी येथील लोकांची सोय इतरत्र करून गोर-गरीब, दु:खी पिडीतांना स्वत: अंगावर पाऊस झेलत त्यांना निवारा दिला. नागरीकांच्या अन्न,वस्त्र व निवारा या गरजा सुद्धा त्यांनी पूर्ण केल्या हे ही वाखण्याजोगे आहे. आज पुन्हा एकदा ही सर्व लोकं आपले दैनंदिन जीवन व्यथित करू लागली यातच खुप मोठी धन्यता आहे.
किरणदादांकडे तालुक्यातील खाजगी, सरकारी दवाखाने तेथील डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी यांचे अतितातडीचे क्रमांक नव्हे तर पुणे, मुंबई येथील मोठ-मोठ्या हॉस्पीटल व त्यांच्या डीनचे थेट संपर्क आहे. त्यामुळे एखाद्या रूग्णांस अत्यावश्यक सेवा पाहिजे असल्यास त्यांनी ती सुद्धा उपलब्ध करून दिली. यामुळे हे ही खरे कोरोना योद्धे आहेत हे नाकारून चालणार नाही. पडद्यामागे राहुन त्यांनी खुप मोठमोठी जबाबदारी पार पाडलेली आहे. बारामतीच्या असापास इंदापूर, दौंड, फलटण, पुरंदर या तालुक्यातील रूग्णांना सुद्धा मदत केली. राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी सुद्धा बारामतीकरांच्या आरोग्याची जातीने लक्ष दिले. वेळ पडल्यावर प्रशासनाला खडे बोल दिले. आज बारामतीकरांसाठी ज्येष्ठ नगरसेवक किरणदादा एवढी सहकार्याची भूमिका ठेवत असतील तर नक्कीच राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांची बारामतीकरांवर जागतिक संकटात करडी नजर आहे हे ही तेवढे सत्य आहे.