बारामती(वार्ताहर): दि.25 ऑक्टोबर रोजी दु.1.30 वा. इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते श्री ब्रह्मचैतन्य फार्मा मेडिकल दुकानाचे उद्घाटन होणार असल्याचे प्रोप्रा. हसमुख गुलाबराव गावडे यांनी कळविले आहे.
भारत सरकार नोटरी, ऍड.गुलाबराव बी.गावडे यांचे चिरंजीव हसमुख गावडे यांनी नव्याने ब्रह्मचैतन्य फार्मा मेडिकल ढोले कॉम्प्लेक्स्, एस बँके जवळ, भिगवण रोड, बारामती याठिकाणी सुरू करीत आहेत. या भव्य-दिव्य मेडिकल दुकानाचा उद्घाटन समारंभ आ.भरणे यांच्या शुभहस्ते होणार आहे.
सर्वांना पत्रिका पाठविण्यात आलेल्या आहेतच मात्र नजर चुकीचे कोणाला पत्रिका न मिळाल्यास त्यांनी हेच आमंत्रण समजून उद्घाटन प्रसंगी उपस्थित रहावे अशी विनंती ऍड.गुलाबराव बी.गावडे व हसमुख गुलाबराव गावडे यांनी केली आहे.