गुळ व्यापारी असोसिएशनने पवार साहेबांची घेतली भेट

बारामती(वार्ताहर): मार्केट कमिटीच्या सेस व गुळ व्यवसायातील अडचणीबाबत पुणे चेंबरचे गुळ असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार यांची नुकतीच भेट घेतली.

यावेळी पुणे चेंबरचे गुळ असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र गुगळे, माजी अध्यक्ष मोहन ओसवाल,पुणे, अजित सेठिया, बाबूशेठ म्हसवडकर (निरा), बारामतीचे माजी नगराध्यक्ष व मर्चंट असोसिएशनचे माजी अध्यक्ष जवाहरशेठ वाघोलीकर व माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव उपस्थित होते. पवार साहेबांनी येणार्‍या अडचणी समजून घेऊन दि.22 ऑक्टोबर रोजी मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सभागृह येथे गुळ व्यापारी व संबंधित अधिकारी यांची मिटिंग आयोजित केली असल्याचे सांगितले आहे. मुंबई येथील मीटिंगमध्ये या अडचणी सोडविण्याबाबत प्रयत्न करू असे चेंबरच्या व्यापार्‍यांना सांगितले. या बैठकीचे आयोजन जवाहरशेठ वाघोलीकर यांनी केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!