बारामती(वार्ताहर):राज्य शासनाने सुरू केलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा दुसरा टप्पा 14 ऑक्टोबर पासुन सुरूवात होत आहे.
दि.14 ते 24 ऑक्टोबर 20 या कालावधीत या मोहिमेतर्गंत सर्व नागरिकांची आरोग्य कर्मचारी, आशा, अंगणवाडी सेविका, शिक्षक व स्वयंसेवकांच्या टीम मार्फत घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व नागरिकांनी आरोग्य तपासणीसाठी सहकार्य करावे व आपली तपासणी करून घ्यावी व कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्यास तात्काळ आपली एंटीजेन तपासणी करून घ्यावी. जरी कोरोनाचे रुग्ण कमी प्रमाणात आढळून येत असले तरी सुद्धा धोका अजून टळलेला नाही त्यामुळे आपण सर्वांनी दक्ष राहणे गरजेचे आहे व सर्वांनी मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे व सोशल डिस्टंसींग पाळणे या बाबी अंगीकारून कोरोनाला दूर ठेवण्यास मदत करावी