बारामती(वार्ताहर): पक्षाचे युवा कार्यकर्ते हीच पक्षाची खरी शक्ती आहे. त्यामुळे येणार्या काळात युवकांचे संघटन मजबुत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रदेश उपाध्यक्ष तथा पक्षनिरीक्षक किशोर मासाळ यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.
अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची पक्ष कार्यालयात आढावा बैठक सोशल डिस्टन्स् नियमाचे तंतोतंत पालन करीत नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत श्री.मासाळ बोलत होते.

यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, युवक जिल्हाध्यक्ष कपिल पवार, कार्याध्यक्ष संजय कोळगे, किसनराव लोटके, काकासाहेब तापकिर, रोहन साबळे, चंद्रकांत मरकड, शरद शिंदे, नरेंद्र जाधव, नितीन धांडे, ऋषीकेश गायकवाड, विक्रम कळमकर, मनोज भालसिंग, निलेश गोडसे, संतोष पवार, रवी माळुंजकर, संदीप सोनवणे, चारूदत्त शिंगर, नवाझ कुरेशी इ. युवक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मासाळ पुढे म्हणाले की, युवकांमुळेच नगर जिल्ह्यात जो बदल घडून आला आहे. युवा आमदारांना निवडून दिले आहे. पक्षाचे युवकचे पदाधिकारी जिल्ह्यात सक्रीय असुन, विविध प्रश्र्न सोडविण्यास पुढाकार घेत आहे. युवकांनी सक्षमपणे संघटन वाढविण्याची गरज आहे. येणार्या काळात युवकच्या पदाधिकार्यांनी कामे न केल्यास वेगळा विचार सुद्धा करावा लागेल असाही इशारा त्यांनी यावेळी दिला.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी युवकांना उत्तम मार्गदर्शन केले.