पुणे(वार्ताहर): येथील आलआजिम परफ्युम पुण्यातील नावाजलेले इम्पोर्टेड सेंट व अत्तर चे दुकानाच्या शाखा न-2 चे उद्घाटन कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार तसेच मुस्लीम कॉपरेटिव्ह बँकेचे चेअरमन तथा शिक्षणमहर्षी पी.ए.इनामदार यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
याप्रसंगी स्थानिक नगरसेविका नंदाताई लोणकर, नगरसेवक गफूरभाई पठाण, नारायणराव लोणकर, ज्येष्ठ नेते आजमभाई पानसरे, साईनाथ बाबर मुस्लिम बँकेचे संचालक चिरागउद्दीन शेख, आलताफ सय्यद, हाजी कमरुद्दीन सय्यद, सहारा फौंडेशनचे परवेज सय्यद इ.मान्यवर उपस्थित होते.

आ.पवार मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, इत्तरमध्ये इतके प्रकार असतात हे शेख कुटुंबियांच्या आलआजिम परफ्युम दुकानाचे उद्घाटन केल्यानंतर कळाले. या व्यवसायामुळे इतर 13 लोकांना रोजगार उपलब्ध करून देणारे शेख कुटुंबिय आहे. या व्यवसायात किती व्याप्ती आहे आणी हे शेख बंधूंना अवगत झाले आहे. या दुकानाची तिसरी शाखा लवकरच सुरू करावी व त्या शाखेचे उद्घाटनाचे भाग्य पुन्हा मला मिळावे अशीही प्रार्थना त्यांनी यावेळी केली.
कोणत्याही व्यवसायात आर्थिक नियोजन महत्वाचे असते. ते आर्थिक नियोजनाचे अभ्यास करून शेख बंधुंनी दुसरी शाखा सुरू केली असल्याचे डॉ.पी.ए. इनामदार यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.