बारामती(वार्ताहर): येथील शिवसेना बारामती तालुका महिला आघाडी संघटिका सौ.कल्पना लक्ष्मण जाधव (काटकर) या गणेश वधु-वर सूचक मंडळाच्या माध्यमातून कोरोनाच्या काळात बहुसंख्य लोकांना मदतीचा हात दिला. त्यानिमित्त विविध संघटनांतर्फे त्यांना कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
महाराष्ट्र राज्यातील मावळा संघटना, पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशन, अनंतशांती बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्था व अखिल भारतीय मराठा महासंघ, दौंड तालुका यांनी कोरोना योद्धा म्हणून प्रमाणपत्र देवून त्यांना सन्मानीत केले आहे. कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर रूग्ण कोण आहे, कोणत्या तालुका व जिल्ह्यातील आहे याचा विचार न करता त्यांना प्लाझ्मा, बेड, रूग्णवाहिका, रक्तपुरवठा इ. सारखी अतितातडीची सेवा उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. पडद्यामागे राहुन सौ.जाधव यांनी जी भूमिका बजावली आहे त्याचे कौतुक सर्वत्र होत आहे. पक्ष कोणताही असुन सामाजिक बांधिलकी जपण्याचा, व रूग्ण, रूग्णांच्या नातेवाईकांना धीर देण्याचे काम सौ.जाधव यांनी केले आहे. या कामाची दौंड विधानसभा सदस्य ऍड.राहुल कुल यांनी दखल घेऊन लेखी पत्राद्वारे कार्यास शुभेच्छा दिलेल्या आहेत.
आणखीन कोणाला मदत लागल्यास त्यांनी सौ.जाधव यांना 7083216845 यावर संपर्क साधावा असेही त्यांनी आवाहन केले आहे.