बारामती(वार्ताहर): काही तथाकथित स्वयंघोषित लोक दि.कॉन्फरन्स ऑफ चर्चेस ऑफ खाईस्ट इन वेस्टर्न इंडियाचे विश्र्वस्त असल्याचे भासवून बेकायदेशीरपणे संस्थेची जागा संगनमताने विक्री, हस्तांतरण, करार, नोटरी करीत असल्याचे समजत आहे. त्यामुळे खरेदी व विक्री करणार्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे ख्रिस्ती समाजाचे सामाजिक कार्यकर्ते वैभव वसंत पारधे यांनी लेखी अर्जाद्वारे कळविले आहे.
या संस्थेच्या जागेबाबत मे.दुय्यम निबंधक बारामती, मौजे भिगवण (ता.इंदापूर), तरंगवाडी (ता.इंदापूर), श्रीगोंदा (जि.अहमदनगर) इ. ठिकाणच्या जागा मिळकती न्यासाच्या मालकीच्या असुन संस्था विश्र्वस्ताबाबत धर्मादाय आयुक्त अहमदनगर याठिकाणी सन 2004 पासुन वाद प्रलंबित आहेत व मिळकतीबाबत देखील न्यायालयात खटले चालू असताना तरीही जागेची बेकायदेशीर खरेदी विक्री सुरूच आहे. समाजातील युवकांमध्ये समाजाच्या जागेच्या बेकायदेशीर विक्रीमुळे रोष निर्माण झालेला आहे. वेळ पडल्यास कायदा हातात घेण्यास युवक मागे पुढे पाहणार नाही अशीही संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. तरी जागा खरेदी करणार्यांनी सावधानता बाळगावी.
धर्मादाय आयुक्त अहमदनगर यांचे माहिती अधिकारात मागितलेले कार्यालयाने 18 प्रकरणे प्रलंबित असल्याचे नमूद केले आहे.