बारामती(वार्ताहर): बारामती नगरपरिषदचे मुख्याधिकारी किरणराज यादव यांना आज सोमवार रोजी प्रहार अपंग क्रांती संघटना बारामती तालुका व शहरातील अपंग बाधंवाच्या विविध मागण्या संदर्भात निवेदन देण्यात आले.
यामध्ये अपंगांना विनालिलाव गाळे द्यावेत, अपंगाच्या घरपट्टीत सवलत द्यावी, अपंग कक्ष सुरु करावे इ.मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी प्रहार अपंग क्रांती संघटना बारामती तालुका अध्यक्ष मृत्युजंय सावंत, उपाध्यक्ष दीपक शिंदे, कार्याघ्यक्ष संजय अहिवळे, संपर्क प्रमुख भूमदेव मदने, शहराध्यक्ष प्रशांत गायकवाड, दिपक मराठे, सुरज गायकवाड, जाधव काका बारवकर, महादेव मोरे, बाळु रचपुत, सजंय गायकवाड तसेच शहरातील व तालुक्यातील सर्व प्रहार अपंग क्रांती संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.