बारामती(वार्ताहर): येथील ग्लोबल शेपर्स कम्युनिटी व आर.बी.एल.बॅक यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच नगरसेविका सौ.मयुरी शिंदे यांच्या पुढाकाराने महिलांची मोफत तपासणी करण्यात आली.
आमराई भागातील माता रमाईभवन येथे जागतिक कोरोना पार्श्र्वभूमीवर 200 महिलांचे जनरल चेकअप, शुगर व ब्लड प्रेशर तपासणी करण्यात आली. मास्क, सॅनिटरी नॅपकीन व मेडिसिनचे मोफत वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी डॉ.राजाराम नेमाने व त्यांच्या सहकार्यांनी विशेष परिश्रम घेतले. याठिकाणी महिलांनी उत्स्फूर्तपणे तपासणी करून घेतली. माझा प्रभाग, सुरक्षित प्रभाग या माध्यमातून नगरसेविका मयुरी शिंदे यांनी नागरीकांना कोरोना विषयी माहिती देऊन महिलांमध्ये जनजागृती केली व सर्वांचे आभार मानले.