तालुका गुन्हे शोध पथकाची कारवाई : गावठी बनावटीचे पिस्टलसह आरोपीस अटक

बारामती(वार्ताहर): दोन दिवस-रात्र मेडद येथील गणेश काशिद याच्यावर बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने वेशांतर करून गावठी बनावटीचे पिस्टलसह आरोपीस गु.र.नं.628/2020 भारतीय हत्यार कायदा कलम 3(25) सह 27 अन्वये गुन्हा नोंद करून त्यास अटक केलेली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांना बातमीदारामार्फत गोपनीय माहितीनुसार मेडद येथे राहणारा गणेश काशीद याच्याकडे देशी बनावटीचे गावठी पिस्टल आहे. त्यानुसार श्री.घोलप यांनी बारामती तालुका पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे सहा.पोलीस निरीक्षक लंगुटे व त्यांच्या पथकाला कारवाईचे आदेश दिले. या पथकाने चक्क वेशांतर करून काशिद आरोपीवर पाळत ठेवली. मेडद गावातील भैरवनाथ पेट्रोल पंप येथे असल्याची पथकास खबर मिळताच, पथक तेथे पोहचल्याची आरोपी काशिद यास चाहुल लागताच तो पळून जावू लागला. पथकाने पाठलाग करून त्यास पकडले व अंग झडती घेतली असता त्याच्या कंबरेला डाव्या बाजुस एक गावठी बनावटी पिस्टल अग्नीशस्त्र मिळून आले. सदर पिस्टलच्या परवान्याबाबत विचारले असता त्याने परवाना नसल्याचे सांगितले.

सदर कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप, सहा.पोलीस निरीक्षक योगेश लंगोटे, सहा.फौजदार दिलीप सोनवणे, पो.कॉ.नंदू जाधव, विनोद लोखंडे, मंगेश कांबळे, प्रशांत राऊत, संतोष मखरे यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!