मदरसा दारूल ऊलूम मौलाना युनूसियाच्या सर्व ट्रस्टींना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी उच्च न्यायालयाच्या नोटीसा

बारामती(वार्ताहर): येथील मदरसा दारूल ऊलूम मौलाना युनूसीयामध्ये आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते सोहेल शेख (बागवान) यांनी दाखल केलेल्या रीट पिटीशन नुसार सर्व ट्रस्टींना मा.उच्च न्यायालयाच्या नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत.

मदरसाचे ट्रस्टी मुबारक हसनभाई तांबोळी (अध्यक्ष), आखलाक बशीर बागवान (उपाध्यक्ष), सलिम फकीर बागवान (सेक्रटरी), आसिफ जाफर बागवान, शाकीर अब्दुलकरिम बागवान, इस्माईल महमंद तांबोळी, हमजु इस्माईल शेख, अमीर महमंद मुलाणी, राजुभाई लतीफ बागवान, मुस्ताक लतीफ बागवान, शब्बीर रज्जाकभाई तांबाळी, जब्बार शब्बीर पठाण, अलताफ उर्फ पप्पू सरदार पठाण, सलिम दस्तगीर बागवान, आलताफ उर्फ पप्पू पटेल यांच्यासह महाराष्ट्र सरकार, प्रिन्सिपल सेक्रटरी, मायनॉरिटी डेव्हलपमेंट महाराष्ट्र, जॉईट चॅरिटी कमिशनर, पुणे, व चिफ एक्सिक्युटीव्ह ऑफीसर, वक्फ बोर्ड औरंगाबाद यांना नोटीसा काढण्यात आलेल्या आहेत.

सदरील मदरसा हा अंदाजे 18 वर्षापासून बारामती येथे सुरू आहे. मदरसामध्ये सोहेल शेख(बागवान) हे नेहमी वेळोवेळी अनेक रक्कम निधी स्वरूपात देत असतात. सदरील मदरसामध्ये अनेक आर्थिक गैरव्यवहार होत होते व आहे त्याकामी सोहेल शेख (बागवान) यांनी मुंबई येथील मा.ना. उच्च न्यायालय सोा यांचे येथे रिट पिटीशन दाखल केलेले आहे. त्याबाबत सदरील रिट पिटीशन मा.ना. उच्च न्यायालय सोा खंडपीठ जस्टीस आर.डी. धनुका व जस्टीस महादेव जे. जामदार सोा यांचेसमोर सुनावणी होवून त्यांनी दि. 1 ऑक्टोबर 2020 रोजी मदरसाच्या सर्व ट्रस्टींसह इतरांना नोटीसा काढलेल्या आहेत.

शासनाच्या महाराष्ट्र सरकार, प्रिन्सिपल सेक्रटरी (मायनॉरिटी डेव्हलपमेंट महाराष्ट्र) व जॉईट चॅरिटी कमिशनर, पुणे, यांनी ऍफीडेव्हीट फाईल करण्याचे आदेश पारीत केलेले आहेत. सदरील पिटीशनचे काम सोहेल शेख यांचेतर्फे ऍड. सुशांत प्रभुणे हे पाहत आहेत. लवकरच सदरील मदरसाच्या भ्रष्टाचार हा उघडकीस येईल असे दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!