महाराष्ट्र पोलिस बॉइज संघटनेच्या सातारा महिला जिल्हाध्यक्षपदी प्रियांका तोरस्कर

सातारा: महाराष्ट्र पोलीस बॉइज संघटनेचे सातारा जिल्हा प्रमुख प्रकाश गायकवाड यांच्या आदेशानुसार प्रियांका तोरस्कर यांची महिला आघाडीच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रियांका या सामाजिक कार्यात सक्रीय असुन, निर्भिड व निस्वार्थी वृत्तीच्या त्या आहेत. त्यांच्या कामाचा आलेख पाहता त्यांना या पदावर काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी एकमेव महाराष्ट्र पोलीस बॉइज संघटना आहे. या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर या संघटनेचे जाळे पसरलेले असुन, विविध पदाधिकारी व कार्यकर्ते तन-मनाने काम करत आहेत.

पोलीस हे सुद्धा माणसं आहेत. त्यांना सुद्धा कुटुंब, घर, नातेवाईक व भावना आहेत. ज्यावेळी अधिकारी किंवा पोलिस कर्मचारी यांच्यावर नाहक अन्याय होतो तेव्हा महाराष्ट्र पोलीस बॉइज संघटना रस्त्यावर उतरते व संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे प्रश्र्न प्रामाणिकपणे प्रश्र्न सोडवित असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!