या वस्तुंवर 28 दिवस राहतो कोरोना

मुंबई: नोट, फोन स्क्रीनवर कोरोना व्हायरस 28 दिवस जिवंत राहू शकतो, असा दावा ऑस्ट्रेलियाच्या नॅशनल सायन्स एजन्सीच्या संशोधनात करण्यात आला आहे. या संशोधकांनी तीन वेगवेगळ्या तापमानात अंधारात कोरोना व्हायरसची चाचणी केली. यामध्ये तापमान जास्त गरम झाल्यास कोरोना व्हायरसचे अस्तित्व कमी होत असल्याचे पुढे आले आहे.

कोरोना व्हायरस नोट, फोन स्क्रीनवर 28 दिवस जगू शकतो. ट्रेव्हर ड्रीव्हच्या यांच्या मते, जर एखादी व्यक्ती या साहित्यांविषयी निष्काळजी असेल आणि त्यास स्पर्श करुन तोंडाला, डोळ्यांना किंवा नाकात स्पर्श करत असेल तर त्याला कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग पृष्ठभागावरुन जास्त प्रमाणात होतो. पूर्वीच्या संशोधनात असे दिसून आले आहे की कोरोना व्हायरसचा संसर्ग खोकला, शिंका येणे किंवा बोलण्यामुळे थुंकीच्या बारीक कणांद्वारे होतो.

संशोधकांनी 20 डिग्री सेल्सियस (68 डिग्री फॉरेनहाइट) तापमानात फोन स्क्रीनवर गुळगुळीत पृष्ठभागावर कोरोना व्हायरस अधिक सक्षम झाला. काच, स्टील, प्लास्टिक, नोटांवर कोरोना व्हायरस 28 दिवस जगू शकेल, असा दावा त्यांनी केला. याव्यतिरिक्त, 30 डिग्री सेल्सियस (86 डिग्री फॉरेनहाईट) पर्यंत जगण्याचा त्यांचा वेळ कमी होऊन सात दिवसांवर आला आहे. 40 डिग्री सेल्सियस (104 डिग्री फॉरेनहाईट) पर्यंत असताना, कोरोना व्हायरस केवळ 24 तास जगू शकेल. छिद्रांच्या पृष्ठभागावर म्हणजे कापसावर सर्वात कमी तापमानात कोरोना व्हायरस 14 दिवस जिवंत राहू शकतो. उच्चतम तापमानात 16 तासांपर्यंत व्हायरसचे टीकणे शक्य आहे.

ऑस्ट्रेलियन सेंटर फॉर डिसीज प्रिपेयरडनेसचे संचालक ट्रेव्हर ड्रीव्ह यांनी सांगितलं की, या संशोधनात वेगवेगळ्या सामग्रीवर चाचणी होण्यापूर्वी व्हायरसचे नमुने काढण्यात आले होते. या दरम्यान अतिसंवेदनशील प्रणालीचा वापर करुन त्यात आढळले की जिवंत व्हायरसचा अंश संक्रमित होण्यास सक्षम आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!