बारामती(वार्ताहर): श्री.काशिविश्वेश्वर तरुण मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन येथील इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित लेट, माणिकाबाई चंदुलाल सराफ ब्लड बँक येथे करण्यात आले होते.
बारामतीमध्ये कोरोणाच्या प्रादुर्भाव असल्याने रक्तदात्यांनी रक्तदान करण्यासाठी ब्लड बँकेकडे पाठ फिरवली त्यामुळे ब्लड बँकेतून रक्त पुरवठा करणे अशक्य झाले आहे. रक्तदान शिबिरे आयोजित करून ब्लड बँकेत रक्त संकलित केले जाते मात्र कोरोनाची भीती नागरिकांनी मनात बाळगल्याने रक्त संकलन करण्यास मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत, रक्त संकलन होत नसल्या कारणाने बारामतीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे त्यामुळे गरजू रुग्णांना रक्त पुरवठा करणे अशक्य झाले आहे. या पार्श्वभुमीवर ब्लड ब्लड बँकेच्या विनंतीवरुन श्री.काशिविश्वेश्वर तरुण मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. गेले दहा वर्षापासुन ब्लड बँकेच्या गरजेनुसार तूटवडा असेल तेव्हा रक्तदान करत असतो.
ब्लड बँकेचे जनसंपर्क अधिकारी सोमनाथ कवडे यांनी गटनेते सचिन सातव व नगरसेवक सुरज सातव यांना याबाबत माहिती दिली. त्यांच्या विनंतीला मान देवून तत्काळ रक्तदान शिबीर आयोजित करून 35 रक्तदात्यांनी रक्तदान करीत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.