झोपडपट्टी वासीयांच्या प्रश्र्नासाठी झोपडपट्टी सुरक्षा दल आक्रमक

बारामती: इंदापूर तालुक्यातील निनिमगांव येथील गट नं.110, स.नं.13 मधील झोपडपट्टी वासियांच्या लाईटच्या प्रश्र्नासाठी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव वैराट यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ बारामती अधिक्षक अभियंता श्री.पावडे यांना भेटण्यास गेले असता, अधिक्षक अभियंता यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले.

मौजे गाव निरनिम येथे गेली 30 ते 40 वर्षापासुन झोपडपट्टी स्थायिक आहेत. याठिकाणी अनुसूचित जाती-जमाती, भटक्या विमुक्त, अल्पसंख्यांक समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरीक राहत आहेत. फेब्रुवारी-2020 मध्ये कार्यकारी अभियंता इंदापूर यांचेकडे वीज जोडणी प्रस्ताव सादर करून सुद्धा आजतगायत कार्यकारी अभियंता इंदापूर यांनी घरगुती वीज जोडणी केली नाही.

महाराष्ट्र शासनाचा 8 ऑक्टोबर 016 च्या शासननिर्णयाद्वारे सदर कनेक्शन देताना ग्राहकाकडून 200 रूपयांच्या स्टॅम्पपेपरवरती वीज जोडणी देणे गरजेचे असताना देखील गेली 8 महिन्यांपासून कोणतीही कारवाई न झालेमुळे झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव वैराट यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आक्रमक होत आपला संताप व्यक्त केला.

त्यावेळी अधिक्षक अभियंता श्री.पावडे यांनी येत्या बुधवारी अधिकारी व संघटनेचे पदाधिकारी यांची लवकरच बैठक लावून लवकरात लवकर मार्ग काढण्याचे आश्र्वासन दिले.

यावेळी राज्यसंघटक तानाजी पाथरकर, जिल्हाध्यक्ष बापू शेंडगे, जिल्हा संघटक आबासाहेब शिंदे, पुणे शहराध्यक्ष महम्मद शेख, महिला अध्यक्षा सुरेखा भालेराव, जिल्हा कार्याध्यक्ष माधव गायकवाड, किर्तीताई गायकवाड इ. मान्यवर हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!