बारामती (वार्ताहर): राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त व आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाई यांच्या जयंतीनिमित्त वडगाव निंबाळकर, होळ, चोपडज, पळशी व मुढाळे या गावात 500 कुटुंबियांना आर्सेनिक अल्बम-30 या गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले.

सोमवार दि.5 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी 9 वा. महाराष्ट्र राज्य पैलवान नानासाहेब मदने मित्र परिवार यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, ग्रामपंचायत पळशीचे सरपंच रावासाहेब चोरमले, माजी सरपंच माणिकराव काळे, खरेदी विक्री संघ निराचे सभापती मुरलीधर ठोंबरे, गुलदगड सर, ग्रामपंचायत पळशीचे सदस्य लक्ष्मण कोळेकर, होळचे पोलीस पाटील संतोष होळकर, बबनराव भंडलकर, ग्रामपंचायत चोपडजचे मा.उपसरपंच उमेश गायकवाड, चोपडजचे पोलीस पाटील लक्ष्मण गायकवाड,श्री.चांगदेव भंडलकर इ. मान्यवर उपस्थित होते.
आर्सेनिक अल्बम-30 या गोळ्या पणदरे येथील मूळव्याध स्पेशालिस्ट डॉ.दिपेंद्र कोकरे व पुण्याचे युवा उद्योजक प्रसाद कोंडे-पाटिल यांनी उपलब्ध करून दिल्या. या कार्यक्रमास आकाश वाघमारे, गजानन भंडलकर, अजर तांबोळी, निलेश भंडलकर, महेश मदने, गोरख खोमणे, सोमनाथ मदने, सेतुराज होळकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
वडगांव निंबाळकर, होळ, चोपडज, पळशी व मुढाळे याठिकाणी सोशल डिस्टन्स्च्या नियमाचे पालन करीत कार्यक्रम यशस्वी करण्यात आला असल्याचे जय मल्हार क्रांती संघटना पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष व बहुजन हक्क परिषद राज्याचे युवाध्यक्ष पैलवान नानासाहेब मदने यांनी सांगितले व उपस्थितांचे आभार व्यक्त केले.