बारामती(वार्ताहर): येथील नामवंत अजित ड्रायक्लिनर्स या दुकानाचे उद्घाटन कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या हस्ते संपन्न झाले.
रविवार दि.4 ऑक्टोबर 2020 रोजी दु.12.30 वा. जिजा हाईटस्, छत्रपती शिवाजी उद्यानासमोर, कसबा येथील प्रशस्त जागेत स्थलांतर करण्यात आले आहे. या झालेल्या उद्घाटनास मा.नगराध्यक्ष सदाशिव सातव, योगेश जगताप, गटनेते सचिन सातव, युनियन बँकेचे शाखाधिकारी चिंतामणी फुटके, नगरसेवक सुरज सातव या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थिती झाले.
आ.रोहित पवार यांनी पाहणी करून अजित ड्रायक्लिनर्स कौतुक केले. बारामती कसब्या ठिकाणी एवढी भव्य-दिव्य लॉन्ड्री पाहुन त्यांनी आश्र्चर्य व्यक्त केले. अजित ड्रायक्लिनर्सचे मालक लक्ष्मण पवार, अजित पवार, यश पवार यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी खा.शरदचंद्रजी पवार साहेबांचे कपडे अजित ड्रायक्लिनर्स मध्ये असतात असे सदाशिव सातव यांनी सांगितल्यावर त्यांनी विशेष कौतुक करून आनंद व्यक्त केला. योगेश जगताप यांनी अजित ड्रायक्लिनर्स हा व्यवसाय कसा घडला याबाबत थोडक्यात आ.रोहित पवार यांना पूर्वइतिहास सांगितला.
यावेळी बहुसंख्य ग्राहक, बारामती तालुका व शहर परिसरातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी उपस्थितांचे आभार अजित पवार यांनी मानले.