बारामती(वार्ताहर): उत्तर प्रदेशच्या सरकारने कोरोना पार्श्र्वभूमीवर नागरीकांची आर्थिक परिस्थितीचा आढावा घेत चालु वर्षाचे अनुदानित, विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शैक्षणिक संस्थेचे शुल्क माफ केले आहे. या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने शैक्षणिक शुल्क माफ करावे अशी मागणी सी.आर.संघटनेने उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
जागतिक कोरोनाच्या विषाणूमुळे लॉकडाऊन करण्यात आले. यामध्ये गोर-गरीब, पिडीतांच्या हातचे काम गेले. राजेगार ठप्प झाला. सर्वसामान्य नागरीकांचे बँकांमधील पैसे संपले अशातच खाजगी शैक्षणिक संस्था फोन करून फी भरण्याचा तगादा लावीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने चालु वर्षाचे शैक्षणिक शुल्क माफ केल्यास सर्वसामान्य नागरीकांना दिलासा मिळेल. अशा आशयाचे पत्र सी.आर.संघटनेचे राज्याचे सरचिटणीस संजय वाघमारे, उपाध्यक्ष वस्ताद अस्लम शेख व राज्य संघटक अमीन शेख यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिले आहे.