भटकंती म्हटले की, सायकल, दुचाकी, चारचाकी, विमानाने असो किंवा जहाजाने हा शब्दच उत्साहवर्धक व मनाला एक प्रकारची ऊर्जा मिळवून देणारा भटकंती शब्द आहे. या शब्दाला खरा न्याय देणारे खुप आहेत. पण भटकंतीला आव्हान देणारे सुद्धा ङ्कअवलियाङ्ख आहेत. या अवलियांपैकी ऍड.श्रीनिवास वायकर, रणधीरसिंह जाचक, संजय चौधर व डॉ.निखिल लोंढे यांनी तब्बल 910 कि.मी.चे अंतर 15 तासात दुचाकीवर पूर्ण करणारे बारामतीचे सुपूत्र आहेत.

दि.17 सप्टेंबर 2020 रोजी वरील चौघांनी आपआपल्या दुचाकी घेऊन पहाटे साडेचारला बारामती सोडली. फलटण-वाठार-सातारा-कर्हाड-कोल्हापूर मार्गे 200 कि.मी. अंतर पूर्ण केल्यानंतर 7 वा.30 ते 8 वा.15 मी. दरम्यान नाष्टा केला. पुढे निपाणी-संकेश्र्वर-बेळगाव-धारवड-हुबळी-दावणगिरी 550 कि.मी. चा पल्ला पार करीत अपूर्वा रिसोर्ट दु.2 वा.30 मी ते 3 वा.45 मी. या वेळेत दुपारचे जेवण उरकून पुढच्या प्रवासाला प्रारंभ केला. कडरू 710 कि.मी. आलेनंतर सायंकाळी याठिकाणी सहा वाजता चहा घेतला. नंतर अरकलगुडू 825 कि.मी. येथील शाहीदला रात्री 8 वा.30 मि. जेवण केले. पुढे आणखी 85 कि.मी. जाण्याचे होते. पूर्ण घाट, गडद अंधार, पावसाची चिकचिक यामधून मार्ग काढीत पुढे कुर्ग जवळ येताच घाट माथ्यावर पूर्ण धुके, थंड हवा असा 910 कि.मी. प्रवास करीत रात्री 10 वा.30 मी. कुर्ग चे क्लब महिंद्रा रिसोर्ट येथे पोहचलो. असा 15 तास दुचाकी वाहनावर प्रवास केला.

या चौघांनी एक आव्हान अंगी बाळगल्याप्रमाणे कर्नाटकात कुर्ग हे निसर्ग प्रेमींचे ठिकाण आहे. सर्वात श्रीमंत हिल स्टेशनही म्हटले जाते. थंड हवेचे ठिकाण कोडागु जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. समुद्र सपाटीपासुन 1 हजार 150 मीटर उंचीवर आहे. उष्ण-कटीबंध डोंगराळ प्रदेशाचे हवामान आहे. अशा ठिकाणी या चौघांनी हजेरी लावली व निसर्गाचा मनसोक्त आनंद लुटला. ऍड.वायकर म्हणाले की, 15 तास रायडींग हा एक टास्क होता. पाऊस, उखडलेला रस्ता, अचानक येणारे स्पीड ब्रेकर, सोबत पाठीवर सामान, अंधरात रायडींग घाट, खड्डे हे एक आव्हान असल्या सारखे आम्हाला होते. हा सर्व प्रवास सकाळते रात्री मुक्कामी जाण्याचा जो हट्ट, हौस आणि टारगेट होते ते पूर्ण केल्याचा जो आनंद होता तो गगन ठेणगं करण्या एवढा होता.

दुसर्या दिवशी सोशल मिडीयावर भरभरून शुभेच्छा, आश्र्चर्य व्यक्त करणार्या शुभेच्छा व कौतुकामुळे आम्ही भारावून गेलो. आमच्याकडे दोन केटीएम-390 ऍडव्हेंचर, ट्रीम्पह टायगर 800, हार्ले डेव्हीडसन 750 अशी चार वाहने होती.

तुमचा आनंद जोपर्यंत भटकत नाही त्याशिवाय त्याला भटकंती म्हणता येणार नाही. आयुष्यभराचा ठेवा म्हणजे भटकंती म्हटले तर वावगे ठरू नये. आपण केलेली भटकंती कितीही विसरू म्हटले तर विसरता येत नाही ही भटकंतीची खरी मज्जा आहे. या भटकंतीत जीवाचे जीवलग प्रिय व्यक्ती बरोबर असतील ती भटकंती त्या भटकंतीचा आनंद आणखीन द्विगुणीत झाल्याशिवाय राहत नाही हे ही तेवढेच सत्य आहे.

ऍड.श्रीनिवास वायकर यांनी बारामतीत सायकल क्लबची स्थापना करून सायकल चालवा, इंधन वाचवा व पर्यावरणाचे रक्षण करा हा एक प्रकारे संदेशच दिला आहे. सायकलींग बरोबर ट्रेकींग व मोटार सायकल रायडींग सुद्धा सुरू केले. गेल्या सहा वर्षापुर्वी बुलेट क्लब नावाने क्लबची स्थापना केली.आज बारामतीत पाहिले असता सकाळी व्यायामा बरोबर सायकलींग करणार्यांची संख्या वाढत आहे. बारामतीकरांना व्यायाम, सायकलींग, ट्रेकींग, रायडींगची इतकी सवय जडली आहे की, लॉकडाऊनमध्ये सुद्धा ही मंडळी झूम ऍप किंवा गुगल मिटवर व्यायाम करून नागरीकांना एकत्र करीत होती.

सिमेंटच्या जंगलात आणि चार भिंतीच्या घरात वावरणारी माणसे मुक्त जगणे विसरली आहेत. हे जगणे शिकविण्यासाठी कोणी तरी त्याग केलाच पाहिजे. त्याप्रमाणे ऍड.श्रीनिवास वायकर व त्यांची टीम सतत नवनवे रस्ते शोधुन त्या रस्त्याने माणसं जोडण्याचा प्रयत्न करीत आहेत. अन्न-वस्त्र व निवारा मिळाला म्हणजे फलप्राप्ती झाली असे काहींचे म्हणणे असते. मात्र दैनंदिन जीवनाच्या चाकोरीतून बाहेर पडून वेगळे काही तरी करून आनंद मिळवणे म्हणजे मनाला सुखावह वाटल्यासारखे होईल. यावरून लहानपणीचे एक गाणे आठवले.
झुक..झुक..आगीन गाडी
धुरांच्या रेषा हवेत सोडी
पळती घरे,झाडे पाहु या
मामाच्या गावाला जावू या!
या ओळी ऐकल्यानंतर प्रत्येकाच्या डोळ्यासमोर प्रवासाचे वर्णन आल्याशिवाय राहत नाही. वेगळीच प्रवासाची मजा असते. माणुस प्रवासातून घडतो. आज स्वामी विवेकानंदा सारखा माणूस प्रवासातून घडला त्याने संपूर्ण जग पालथे घातले आणि ज्ञानी, जगविख्यात होऊन बसले.

दि.4 व 5 ऑक्टोबर रोजी ऍड.श्रीनिवास वायकर व दैनंदिन व्यायाम करणारे 17 जण एकत्रीत दोन दिवस गरूड माची, ताम्हिणी घाटात गेले होते. दोन दिवस धम्माल, मज्जा आणि खुप काही ऍक्टिव्हीटी सुद्धा केल्या. यामध्ये क्लायबिंग, रॅपलींग, बरमा ब्रिज, ट्रेकिंग आणि वॉटर फॉलचा आनंद लुटला. या अशा विविध उपक्रमामुळे माणुस लढाऊ आणि निर्भय होतो. जगण्याची उमेद त्यांच्या अंगी येते. एकत्रात राहिल्याने सहकार्याची भावना विकसीत होते. विविध नवनवीन डोळ्यात भरतील अशी दृश्ये माणसाचा थकवा घालवितात व आत्मविश्र्वास वाढवतात.

उंच-उंच डोंगरावरून उगवता सुर्य वा मावळतीला जाणारा सुर्य पाहण्याची एक वेगळीच मज्जा असते. डोंगर दर्यातून चालताना सोबतीला दिलेला मदतीचा हात, या डोंगरावरून वाहणारे धबधबे, धुक्याने ओढलेली पांढरी शाल असे काही दृश्य स्वत:च्या नजरेतून टिपणे म्हणजे ते ट्रेकिंग सफल झाल्यासारखे म्हणावे. अशात मित्रांमध्ये गप्पा-गोष्टी, मस्करी, जुन्या आठवणी या सर्वांमुळे ट्रेकींग, सायकलींग, ट्रेकींग, रायडींग यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही.
संपादक : तैनुर शेख