बारामती(वार्ताहर): दि. 06 ऑक्टोबर रोजी दिवसभरात बारामती शहरातून 25 तर ग्रामीण भागातून 10 रुग्ण असे मिळून 29 कोरोना बाधित रुग्ण संख्या आढळून आले आहेत. तर कोर्हाळे बुद्रुक याठिकाणी ऍक्टीव्ह सर्व्हे करण्यात आला असुन 3 रूग्ण बाधीत आढळून आलेले आहेत.
काल 115 जणांचे आरटी-पीसीआर नमुने घेण्यात आले होते त्यापैकी 12 व्यक्ती पॉझिटिव्ह आले आहेत. 55 अहवाल प्रतिक्षेत होते मात्र, त्याचा सुद्धा अहवाल प्राप्त झाला असुन बारामती शहरात 5 व ग्रामीण भागात 1 असे एकुण 6 रूग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह आला असुन उर्वरीत सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
इतर तालुक्यातील एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे. 77 रुग्णांची ऍन्टीजन तपासणी करण्यात आली यामध्ये 17 पॉझिटिव्ह आले आहेत. शहरातील काल दिवसभरात बारामतीत एकूण 35 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असल्याचे बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी कळवले आहे. बारामतीत 3 हजार 568 रुग्ण असून, बरे झालेले 2 हजार 988 आहे तर मृत्यू झालेले ब्यान्नव आहेत.
काल माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमांतर्गत कोऱ्हाळे बुद्रुक याठिकाणी ऍक्टिव्ह सर्वे करण्यात आला त्यामध्ये एकूण 51 संशयितांची एंटीजेन टेस्ट करण्यात आल्या त्यामध्ये 03 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहे. त्यामुळे बारामतीची रुग्ण संख्या 3390 + 03 = 3562 झालेली आहे.