बारामती(वार्ताहर): दि. 05 ऑक्टोबर रोजी 119 जणांचे आरटी-पीसीआर नमुने घेण्यात आले होते. यामध्ये 84 जणांचे अहवाल प्रतिक्षेत होते. यापैकी बारामती शहरात 5 व ग्रामीण भागात 5 रूग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत उर्वरीत सर्व निगेटिव्ह आले आहेत.
काल दिवसभरात बारामतीत रूग्णसंख्या 42 झाली आहे व एकुण रूग्णसंख्या 3530 झालेली असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोज खोमणे यांनी कळविले आहे.